
नांदेड :- सामाजिक न्याय विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नांदेड यांच्या अधिनस्त कार्यरत अनुसूचित जाती व नवबौध्द मुलां-मुलींच्या माहूर, हदगाव, उमरी, नायगाव येथील शासकीय निवासी शाळेतील ६० विद्यार्थ्यांना घेवून श्रीहरीकोटा येथे शैक्षणिक सहल बुधवारी सकाळी ९ वाजता रवाना होणार आहे.
ही शैक्षणिक सहल सामाजिक न्याय भवन, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड येथून १६ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून भारतीय संशोधन संस्था श्रीहरीकोटासाठी रवाना होत आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मिनगिरे यांनी दिली आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द मुलां-मुलींची शासकीय निवासी शाळा, माहूर , हदगाव, उमरी, नायगाव येथील प्रत्येक शाळा १५ विद्यार्थी, विद्यार्थीनी असे एकूण ६० विद्यार्थी व त्यांचे काळजीवाहक म्हणून सोबत अधिकारी, कर्मचारी, शिक्षक हे शैक्षणिक सहलीसाठी भारतीय अंतराळ संशोधक संस्था श्रीहरी कोटा येथे १६ ते १९ एप्रिल या कालावधीत जात आहेत. या विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेऊन करण्यात आली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून या उपक्रमाला मंजुरी मिळाली होती. आता विद्यमान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे या विद्यार्थ्यांना श्रीहरीकोटा येथे रवाना करणार आहेत.