
नांदेड : जम्मू कश्मीर येथील घटनाक्रमानंतर पर्यटनाला गेलेल्या किंवा मंगळवारच्या घटनाक्रमाची संबंधित असणाऱ्या नागरिकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत या संदर्भात हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आले आहेत. जम्मू कश्मीरमध्ये पर्यटनाला गेलेल्या नागरिकांच्या संदर्भात अडचण असेल, संपर्क होत नसेल तर ०२४६२ – २३५०७७ या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन कार्यालय मदतीसाठी सज्ज असून जम्मू-काश्मीरमध्ये थेट संपर्कासाठी काही नंबर प्रशासनाने दिले आहेत यामध्ये जम्मू कश्मीर प्रशासनाने जारी केलेल्या 0194-2483651, 0194-2457543 तसेच व्हाट्सअप क्रमांक 7780805144, 7780938397 क्रमांकाचा समावेश आहे.
नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता जर आपले नातेवाईक अडचणीत असेल तर या क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहनही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे यांनी केले आहे.