प्रशासकीय

नांदेड महानगरपालिकेच्या सब फायर ऑफिसरपदी निलेश कांबळे यांची नियुक्ती

शहरातील फील्ड वर्कची जबाबदारी सांभाळणार, दासरे यांच्याकडे प्रशासकीय पदभार 

नांदेड – नांदेड महानगरपालिकेच्या सब फायर ऑफिसरपदी लिडिंग फायरमन निलेश निवृत्ती कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आता नांदेड शहरातील सर्व फिल्ड वर्कची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यानुसार लिडींग फायरमन निलेश कांबळे यांच्याकडे शहरातील सर्व फिल्ड वर्कची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महापालिकेचे अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे यांच्याकडे आता प्रशासकीय पदभार राहणार आहे. शहरातील सर्व ना हरकत प्रमाणपत्र व इतर प्रशासकीय कामकाज दासरे हे पाहतील तर कांबळे फिल्डची जबाबदारी पार पाडणार आहेत. महापालिकेने पहिल्यांदाच फिल्ड वर्क आणि प्रशासकीय असे कामकाजाचे विभाजन करून कामांमध्ये सुरळीतता आणण्याचा प्रयत्न केला आहे. अग्निशमन विभागासाठी आवश्यक ते सर्व प्रशिक्षण पूर्ण करणारे निलेश कांबळे हे अग्निशमन विभागातील एकमेव अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!