क्राईम

कंधार तालुक्यात ९ लाख १३ हजार रुपयांचा गांजा जप्त 

स्थानिक गुन्हा शाखेची कामगिरी, दोघाविरुद्ध गुन्हा दाखल, पाच लाखांचे चार चाकी वाहनही जप्त 

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात धर्मापुरी तांडा शिवारात गांजाची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेला मिळाल्यानंतर तेथे धाड टाकून तब्बल ९ लाख १३ हजार रुपयांचा गांजा आणि एक ५ लाखांचे चार चाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. १३ जून रोजी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात दोघांविरुद्ध लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा, गांजाची विक्री आणि वाहतूक होत असल्याची बाब पुढे येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्री आणि वाहतूक करणाऱ्या इसमाविरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. अंमली पदार्थांची विक्री आणि वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांना आदेशित केले आहे.

स्थानिक गुन्हा शाखेनेही अशा अंमली पदार्थ विक्री आणि वाहतूक करणाऱ्या करणाऱ्यांना जेरबंद करण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करून रवाना केले आहे. दरम्यान १३ जून रोजी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकास कंधार तालुक्यातील धर्मापुरी तांडा येथे काही इसम गांजाची विक्री वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहिती आधारित स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे यांनी तहसीलदार नंदकिशोर भोसीकर तसेच लोहा पोलीस ठाण्यातील आवश्यक पोलीस बंदोबस्त मनुष्यबळ घेऊन धर्मापुरी तांडा शिवारात छापा टाकला. त्यावेळी एका चार चाकी वाहनांमध्ये गांजाचे १८ मोठे कट्टे आढळले. हा सर्व मुद्देमाल चोरट्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतला आणि पंचनामा केला.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकुमार वाहुळे, पोलीस उपनिरीक्षक बळीराम दासरे, महिला पोलीस उपनिरीक्षक के.सी. बेंबडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक गुंडेराव करले, पो.ना. विठ्ठल शेळके, देविदास चव्हाण, मोतीराम पवार, सिद्धार्थ सोनसळे यांच्या पथकाने केली

 

या गांजाचे एकूण वजन १८२ किलो ७०० ग्रॅम होते. त्याची एकूण किंमत ९ लाख १३ हजार ५०० रुपये इतकी आहे. त्याचवेळी चार चाकी वाहन ५ लाखांचे आहे. या कारवाईत पोलिसांनी १४ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी लोहा पोलिस ठाण्यात माधव विठ्ठल जाधव (वय ३९) रा. धर्मापुरी तांडा मजरे आणि अशोक मरीबा वाघमारे (वय ३०) रा. भुशी रोड ता. कंधार या दोघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!