क्राईम

नांदेडमध्ये सोनू कल्याणकरच्या चार मारेकऱ्यांतील एकावर पोलिसांनी झाडली गोळी

पाठलाग करताना आरोपीने पोलिसांवर केला गोळीबार करण्याचा प्रयत्न, पोलीसांनी प्रत्युत्तरात गोळी झाडून केले जखमी, रिंदा गँगचा सदस्य गोलू मंगनाळेसह सहा जणांवरुद्ध गुन्हा दाखल

नांदेड – नांदेड शहरातील श्रीनगर भागात सोमवारी सकाळी अनिकेत उर्फ सोनू कल्याणकर या ३५ याचा धारधार शस्त्राने वार करत निर्घृण खून करण्यात आला. अंतर्गत वादातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नांदेड पोलिसांनी सोनू कल्याणकरच्या चार मारेकऱ्यांना काही तासात पोलीसांनी अटक केली. यामध्ये पीयुष शिंदे, मधु जोगदंड, रोहित लोट या तिघांसह नांदेड शहराजवळ झरी गावच्या शिवारात लपलेल्या अंकुश गंडनवाड याला थेट गोळी झाडून ताब्यात घेण्यात आले.
सोमवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास श्रीनगर मुख्य रस्त्यावर फिरत असताना सोनू कल्याणकरवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात कल्याणकरचा जागीच मृत्यू झाला. नांदेड शहरात खुनाची ही सलग
तिसरी घटना घडली होती. या खुनाच्या मालिकेमुळे एकूणच नांदेड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्याचवेळी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. सोनू कल्याणकर याचे मारेकरी पोलिसांना तात्काळ हवे होते. त्यानुसार पोलिसांनी माहिती घेत आरोपींना जेरबंद केले. त्यात पीयुष शिंदे, मधु जोगदंड, रोहित लोटचा समावेश होता. एक आरोपी अंकुश गंदनवाड हा नांदेड शहराजवळील पांगरी शिवारात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार एलसीबीचे पथक तिथे पोहचले. पोलीसांना पाहून अंकुश गंदनवाड हा शेतात पळाला.  पोलीसांनी पाठलाग सुरु केला.  तेव्हा आरोपी अंकुश गंदनवाड याने पोलिसांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला; पण फायर झालं नाही. त्याने पुन्हा फायर करण्याचा प्रयत्न करत असतांना स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी आकाश गंदनवाड याच्यावर गोळी झाडली. त्याच्या पायाला गोळी लागली. जखमी अवस्थेत अंकुश गंदनवाड याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि सोनू कल्याणकर यांच्यात नवरात्रीच्या काळात वाद झाला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी देखील वाद झाला होता. त्याच रागातून कल्याणकर याचा खून करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगीतले. शिवाय या खूनाचे आणखी काही कारण आहे का? खुनामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास सुरु आहे.

२०२१ साली रिंदा गँगचा सदस्य गोलू मंगनाळे याने सोनू कल्याणकर यांच्यावर गोळीबार केला होता. त्यात सोनू कल्याणकर बचावला होता. सध्या गोलू मंगनाळे तुरुंगात आहे; मात्र या खून प्रकरणात गोलू मंगनाळे याचा काही सहभाग आहे का याचाही तपास केला जात आहे. मयत सोनू कल्याणकर याची देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोनू कल्याणकर याच्यावर सात गुन्हे दाखल आहेत तर आरोपी अंकुश गंदनवाड हा देखील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर देखील अनेक गुन्हे दाखल आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!