क्राईम

इंस्टाग्रामवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी केले १५ गुन्हे दाखल 

गॅंगवॉरमधील खून प्रकरणात हवा असलेला शाहरुख कबुतर मात्र इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह.. स्टोरी अपलोड करत दिला प्रेयसी अन् आईला संदेश

नांदेड – नांदेडमध्ये सुरू असलेल्या खून मालिकांच्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी गुन्हेगारांच्या इन्स्टाग्राम अकाउंटची कसून तपासणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी तब्बल १५ जणांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. या आरोपितांनी खंजीर, तलवार  गावठी कट्टे घेऊन फोटो पोस्ट केले होते. त्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाल्या आहेत. दुसरीकडे शुक्रवारी झालेल्या गॅंगवॉर मधला पोलिसांना हवा असलेला शाहरुख उर्फ कबूतर हा पोलिसांना अद्यापही सापडला नाही. त्याचवेळी शाहरुखचे इंस्टाग्राम अकाउंट मात्र अद्यापही ऍक्टिव्ह आहे. काही तासापूर्वीच त्याने दोन स्टोरी टाकल्या आहेत. त्यातील एक स्टोरी आपल्या आईसाठी ठेवली.  बस मेरी मां को संभाल लेना तुम, बहोत परेशान हो जायेगी वो, तेरा लाडला लौटेगा जरूर, तू रोना मत.. हे गीत शाहरुख कबुतर याने इंस्टाग्रामवर स्टोरीवर अपलोड केले आहे.
नांदेड शहरात तीन दिवसात पाच खून झाल्यानंतर पोलीस खडबडून जागे झाले आहेत. त्यांनी आता कॉम्बिंग ऑपरेशनसह सोशल मीडियावरही नजर ठेवण्यास प्रारंभ केला आहे. बेकादेशीर पोस्ट तपासत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांना दिले आहेत. नांदेड ग्रामीण पोलिसांनी ७ एप्रिल रोजी अनेक सोशल मीडियाचे इंस्टाग्राम अकाउंट चेक केले. त्यावर आरोपितांनी खंजीर, तलवार, गावठी कट्टा घेऊन फोटो टाकले आहेत. हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याची बाबही पुढे आली आहे तसेच काही आरोपींनी आक्षेपार्ह भाषा वापरली होती. त्यानुसार ग्रामीण डीबी पथकाने तक्रार देऊन आज एकाच दिवशी तब्बल १५ जणांविरद्ध नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही ग्रामीण पोलीस ठाण्यात दहा जणाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शुक्रवारी रात्री नांदेड शहरातील डी मार्टजवळ सदा गँग आणि साई लाला गँगमध्ये टोळीयुद्ध झाले. यात सदा गँगचा अर्जितसिंघ चव्हाण आणि साई लाला गँगचा महंमद अरबाज जागीच ठार झाले; तर साई लाला गँगचा सय्यद आवेज याला शासकीय रुग्णालयात मयत अर्जितसिंघ चव्हाण याचा भाऊ प्रदिप चव्हाण याने खंजरने वार करून ठार केले. या गँगवारमध्ये सहभागी असलेला शेख शाहरुख उर्फ शाहरुख कबुतर हा फरार आहे. शुक्रवारी रात्रीच्या गॅंगवॉरमध्ये तो जखमी झाला अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. शुक्रवारी रात्री झालेल्या गॅंगवॉर प्रकरणात एका गँगचा सदस्य असलेला शाहरुख कबूतर हा पोलिसांना हवा आहे. इतर आरोपींच्या शोधातही पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात  धरपकड केली जात आहे. अशा या वातावरणातही पोलिसांना हव्या असलेल्या शाहरुख कबूतरने आपल्या इन्स्टाग्राम आयडीवर आपल्या स्टोरी अपडेट केल्या आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून फरार आरोपी शाहरुख कबुतर याचा शोध सुरु आहे. मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नाही. उलट फरार असताना शाहरुख कबुतर हा समाज माध्यमांवर सक्रिय आहे. आज मंगळवारी काही तासापूर्वी त्याने आपल्या इंस्टाग्राम आयडीवर स्टोरी अपलोड केल्या आहेत. एक स्टोरी त्याने कदाचित आपल्या प्रेयसीसाठी ठेवली. दुसरी स्टोरी त्याने आपल्या आईला उद्देशून ठेवली आहे.  विशेष म्हणजे शाहरुख कबूतर हा सराईत गुन्हेगार आहे. गुन्हा करून तो  कबुतरासारखा उडून जातो, कुणाला सापडत नाही. म्हणून त्याचं नाव शाहरुख कबुतर आहे असं त्याचे फंटर सांगत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!