क्राईम

नांदेडमध्ये पुन्हा एटीएसकडून काही संशयितांची चौकशी..!

पाकिस्तानी इन्फ्ल्यूंसर दहशतवादी शहजाद भट्टी याच्या संपर्कात असल्याचा संशय, यापूर्वीही काही तरुणांची झाली होती चौकशी

नांदेड – नांदेडमध्ये पुन्हा एकदा एटीएसने पाकिस्तानी इन्फ्ल्यूंसर दहशतवादी शहजाद भट्टी याच्या संपर्कात असल्याच्या संशयवारून बुधवारी काही तरुणांची चौकशी केली. यापूर्वीही याच प्रकरणात काही जणांची १३ मे रोजीही नांदेडसह संपूर्ण राज्यात काही संशयितांची चौकशी करण्यात आली होती. शहजाद भट्टी हा पाकिस्तानमधील एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्यूंसर आहे. त्याच्या संपर्कात हे तरुण असल्याचा यंत्रणांना संशय आला आहे.
भारतात देशविरोधी कारवायामध्ये पाकिस्तानी इन्फ्ल्यूंसर दहशतवादी शहजाद भट्टी समावेश असल्याने तो राष्ट्रीय तपास यंत्रणाच्या रडाररवर आहे. या इन्फ्ल्यूंसरला फॉलो करणाऱ्या किंवा त्याच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून एटीएसने सात ते आठ तरुणांची चौकशी केल्याची माहिती आहे. नांदेड आणि परभणीमधील तरुणांची चौकशी झाल्याची माहिती आहे. पण या तरुणांचा कुठलाही थेट संबंध नसल्याने चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती आहे. एकूणच पुन्हा एकदा या प्रकरणात सोशल मीडिया इन्फ्ल्यूंसर रडारवर आल्याचे दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!