
नांदेड – नांदेड जिल्हा पोलीस दलातील नऊ पोलीस निरीक्षक आणि पाच सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये नियंत्रण कक्षातील तीन पोलीस निरीक्षकांना विविध ठाण्यांचा पदभार सोपविण्यात आला आहे. नांदेड शहरातील वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर व्यंकटराव कदम हे आता हदगाव ठाण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत. शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे आता सोनखेड ठाणे प्रमुख म्हणून काम पाहतील.
नांदेड जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार झालेल्या या बदल्यांमध्ये वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर व्यंकटराव कदम यांची हदगाव पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे. लोहा ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागनाथ शंकर आयलाने यांच्याकडे जिल्हा विशेष शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भोकर येथील अजित पोपट कुंभार हे आता नांदेड शहरातील वजीराबाद ठाण्याचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. जिल्हा नियंत्रण कक्षात असलेले चितांबर शंकरराव कमठेवाड यांना मुखेड पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले आहे. मुखेडचे लक्ष्मण व्यंकटराव केंद्रे हे हिमायतनगर येथे ठाणे प्रमुख म्हणून काम पाहतील. नियंत्रण कक्षातील अरविंद निवृत्ती घोडके हे कंधार ठाण्याचे प्रमुख म्हणून काम पाहतील. कंधार येथील चंद्रकांत विनायक जाधव यांना लोहा ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हिमायतनगर ठाण्यातून अमोल हरिदास भगत यांना नायगाव ठाणे सोपविण्यात आले आहे. नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक मारुती श्रीराम मुंडे यांना आता शहर वाहतूक शाखा वजीराबादचा प्रभार सोपविण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यामध्ये वजीराबाद शहर वाहतूक शाखेचे भागवत टीकाराम नागरगोजे यांना सोनखेड पोलीस ठाण्याची जबाबदारी दिली आहे तर विमानतळ ठाण्यातील संतोष बाळासाहेब जोंधळे यांना सिंदखेड येथे पाठविण्यात आले आहे. माळाकोळी ठाण्याचे महेश ज्ञानदेव मुळीक हे उस्माननगर ठाण्याचे प्रमुख म्हणून काम पाहतील. इस्लापूर ठाण्याची जबाबदारी आता सिंदखेड ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश बळीराम जाधवर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. इतवारा शहर वाहतूक शाखेचे राजकुमार मोतीराम हिंगोले हे माळाकोळी ठाण्याचे प्रमुख म्हणून आता जबाबदारी पार पाडतील.
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या या आदेशानंतर बदली झालेल्या बहुतांश पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी बदलीच्या ठिकाणी रुजू होऊन आपला पदभार स्वीकारला आहे. या फेरबदलामुळे आता जिल्हा पोलीस दलातील कामाला आणखी गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या या आदेशानंतर बदली झालेल्या बहुतांश पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी बदलीच्या ठिकाणी रुजू होऊन आपला पदभार स्वीकारला आहे. या फेरबदलामुळे आता जिल्हा पोलीस दलातील कामाला आणखी गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


