
नांदेड – श्रीक्षेत्र माहूर गडावरील श्री दत्त शिखर संस्थान येथील चिंतामण भारती महाराज यांचे श्री दत्त शिखर संस्थांच्या आवारात असलेल्या घराला विश्वस्त आणि पोलिसांनी कुलूप लावल्याने चिंतामण भारती महाराजांनी श्री दत्त शिखर संस्थान येथील घराच्या पायरीवर शनिवारपासून कुलूप उघडून माफी मागेपर्यंत अन्न त्याग आंदोलन सुरू केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने खळबळ उडाली आहे.
श्री दत्त शिखर संस्थानवर महंत श्री मधुसूदनजी भारती महाराज हयात असताना चिंतामण भारती महाराज यांनी विश्वस्ताविरोधात सोने-चांदीचा अपहार केल्याबद्दल धर्मादाय आयुक्त तसेच पोलिसात तक्रार दिली होती; परंतु या तक्रारीची कुठलीही दखल न घेता उलट त्यांच्याच घराला कुलूप लावल्याने त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून संतप्त प्रतिक्रिया दिल्याने भक्त मंडळीतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
चिंतामणी भारती महाराजांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून जोपर्यंत माझ्या घराचे कुलूप उघडून मला माफीनामा देत नाहीत तोपर्यंत मी अन्न व पाणी त्याग आंदोलन करेल असा व्हिडिओ टाकून भर पावसात आंदोलन सुरू केले आहे. या सर्व प्रकारामुळे चिंतामण भारती महाराजांच्या भक्तमंडळीतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. श्री दत्त शिखर संस्थानचे महंत मालक श्याम भारती महाराज उर्फ धनेश्वर भारती महाराजांनी तत्काळ याप्रकरणी लक्ष घालून तोडगा काढावा अशी मागणी भक्तमंडळीतून होत आहे



