
नांदेड – माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसमधील हजारो कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पक्षात इनकमिंग सुरूच आहे. विजयराव देवडे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी आज २० मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शहरातील मगनपुरा येथील प्रगती महिला मंडळ येथे हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भाजप ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव गाते हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खा. प्रताप पाटील चिखलीकर, भाजपचे महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, ग्रामीण जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, लक्ष्मणराव जाधव, विजयराव देवडे, नामदेव आयलवाड, सुशिलकुमार जाधव, अशोकराव मुगावकर, मनपाचे माजी विरोधी पक्ष नेता दिपकसिंह रावत, विनायक सगर, व्यंकटेश जिंदंम, भुमन्ना आक्कमवाड, मनोहर पवार, महादेवी मठपती, जयश्री जयस्वाल आदींची प्रमुख उपस्थिती होती. बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये विजयराव देवडे लहानकर, नामदेव आयलवाड, व्यंकटराव पार्डीकर, नंदकुमार कोसबतवार यांच्यासह अमोल येरगेवार, अमित काबरा, कृष्णराव चिंतलवार , लक्ष्मणराव जाधव, शिवाजीराव पांगरेकर, विठ्ठलराव आचार्य, विजयकुमार वादे, नरहरी चिकटे, रमेश गिरी,गुलाब ठाकुर, गोविंद शिवभक्त, शंकरराव नांदेडकर, गणपतराव पाचंगे, मनोज पाटील, नेहा शर्मा, भुमन्ना आकेमवाड, सुभाष पाटील, दत्ताजी मोहिते, जयश्रीताई जयस्वाल, सिमाताई राठोड, कोशल्याबाई तेलंग,मारोती पावडे, कमरान देवडे, नामदेव बनसोडे, किशोर इंगळे, बाबुराव मदनवाड, पिंटू वानोळे, तुळशिराम साखरे, बाबु वानोळे, शिवा वानोळे, बबन वानोळे, माधव देवडे, बालु मदनवाड आदीसह हजारो कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण, खा. प्रताप पाटील चिखलीकर ,शिवाजीराव गाते आणि नामदेव आयलवाड यांची यावेळी मार्गदर्शनपर भाषणे झाली.