प्रशासकीय

नांदेड लोकसभेच्या रणांगणात ७४ उमेदवार

शेवटच्या दिवशी गुरुवारी ७२ अर्ज दाखल, आठ एप्रिलपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार

नांदेड  : लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा  शेवटच्या दिवशी गुरुवारी तब्बल ७२ अर्ज दाखल झाले आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत एकूण ७४ उमेदवारांचे ९२ अर्ज दाखल झाले असल्याची जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी माहिती दिली आहे.
    नांदेड लोकसभा मतदारसंघात गुरुवारी भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोसीकर यांच्यासह इतर उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. गुरुवारी  ७२ अर्ज प्राप्त झालेत. उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारांची नावे रात्री उशिरापर्यंत प्राप्त होऊ शकले नाहीत.
नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी ३ एप्रिलपर्यंत १९ उमेदवारांनी २० अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये काँग्रेसचे वसंतराव चव्हाण, ऑल इंडिया मजलिस ए इन्कलाब ए मिल्लतचे शेख मोईन शेख रशीद, राष्ट्रीय किसान पार्टीचे विष्णू जाधव या पक्षाच्या  उमेदवारांसह लक्ष्मण नागोराव पाटील, तुकाराम गणपत बिराजदार, मोहम्मद वसीम, मोहम्मद सिद्दिकी शेख संदलजी, भास्कर चंपतराव डोईफोडे आणि असलम इब्राहिम शेख,  जगदीश पोतरे, सुरज कदम, नागोराव वाघमारे, नय्यर जहा मोहम्मद फेरोज हुसेन,  महारुद्र पोपळाईतकर, अकबर अख्तर खान, साहेबराव गजभारे आणि जफर अली खान महमूद अली खान पठाण या अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. ५ एप्रिल रोजी प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी होईल. तर ८ एप्रिलपर्यंत उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घेता येणार आहे. नांदेड मतदार संघात उमेदवारी दाखल करण्याच्या मुदतीत तब्बल ७४ उमेदवारांनी  ९२ अर्ज दाखल केले आहेत. आता यातील किती उमेदवार छाननी मध्ये पात्र ठरतील आणि त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत किती उमेदवार माघार घेतील याकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!