सामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा परिषदेत विविध कार्यक्रम 

नांदेड – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा परिषदेच्या महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती मंडळाच्या वतीने  १४ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

भिमजयंतीनिमित्त रविवारी  सकाळी १० वाजता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद चन्ना, समाज कल्याण अधिकारी राजेंद्र आऊलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, रेखा काळम -कदम, अमित राठोड, नारायण मिसाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर, कार्यकारी अभियंता अमोल पाटील, आनंदराज भोजराज, श्रीनिवास गंगथडे, अशोक चितळे, प्रकाश रायभोग, कृषी अधिकारी विजय बेतिवार, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर आदींची यावेळी उपस्थिती राहणार आहे.

सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद परिसरात अन्नदान व पाणी वाटप उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येईल. तसेच जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी करणवाल यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम होईल. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. दुपारी साडेबारा वाजता जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये रुबाब भिमाचा फेम महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आशिष कांबळे यांचा जागर भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे.  या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयुक्त जयंती मंडळाचे अध्यक्ष पवन तलवारे, सचिव राजेश जोंधळे, कार्याध्यक्ष रणजीत गजभारे, कार्याध्यक्ष धनंजय वडजे, श्याम कावळे, अशोक कासराळीकर, धनंजय घुमलवार व संयुक्त जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!