राजकीय

खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घेतले श्री तुळजाभवानीचे दर्शन

लोकसभेच्या मतदानाची प्रक्रिया संपताच चिखलीकर मातेच्या चरणी लीन

नांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पहिल्यांदाच धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील  श्री तुळजाभवानी मंदिरात जाऊन श्री तुळजाभवानी मातेची पूजाअर्चा करून आशीर्वाद घेतला. यावेळी जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी तुळजाभवानी मातेसमोर याचना केली.

नादेड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक नुकतीच पार पडली. २६ एप्रिल रोजी मतदान पार पडल्यानंतर खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पहिल्यांदाच तुळजापूर येथे जाऊन तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करून त्यांनी मातेच्या चरणावरती माथा टेकला. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी येथील भाविक भक्तांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याशी चर्चा केली. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दिलीप सोनटक्के, सुरेश राठोड, जितू जेठवाणी, प्रा. सुनील नानवटे यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती.

दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री विनोद तावडे हे  नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या  निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री विनोद तावडे हे नांदेड दौऱ्यावर आले होते. त्यांनी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या साई सुभाष या वसंतनगर स्थित निवासस्थानी सदिच्छा भेट दिली . खा.चिखलीकर परिवाराच्या वतीने तावडे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.  यावेळी माजी महापौर अजय सिंह बिसेन, अरविंद भैय्या निलंगेकर आदींची उपस्थिती होती. नांदेड लोकसभा मतदारसंघातील एकूण राजकीय परिस्थिती. झालेले मतदान, जनतेचा कौल या अनुषंगानेही खा. चिखलीकर आणि विनोद तावडे यांच्या चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!