
नांदेड : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या नांदेड महानगर उपाध्यक्षपदी उमेश उर्फ बाळासाहेब पाटील कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवा मोर्चाच्या वतीने विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पाटील कदम यांच्यावर महानगर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
विधान परिषदेचे आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते उमेश पाटील कदम यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रतिनिधी बाळूभाऊ राऊत, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत शिरसागर, ओम बच्चेवार यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन जबाबदारीच्या माध्यमातून पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासोबतच युवा वर्गाला भाजपशी जोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उमेश पाटील कदम यांनी सांगितले.
दरम्यान, ७ ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने नांदेडमध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत क्षिरसागर यांनी केले.



