आर्थिक

आयकर विभागाच्या नांदेडमधील धाडीत सापडले रोख १४ कोटी आणि आठ कोटींचे १२ किलो दागिने

अक्षयतृतीयेच्या दिवशी टाकलेल्या धाडीत सापडले हिरे, ५० सोन्याचे बिस्किट

नांदेड – अक्षयतृतीयेच्या पहाटे नांदेडमधील भंडारी बंधूंच्या घरी आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत मोठे घबाड सापडल्याचे उघड झाले आहे. तब्बल १७० कोटींची बेहिशेबी मालमत्तेचे कागदपत्र या धाडीत जप्त करण्यात आली आहेत. आयकर विभागाने केलेल्या या कारवाईत  १४ कोटी रुपये रोख स्वरूपात आढळले आहेत. तर आठ कोटींचे दागिनेही होते. त्यामध्ये हिरे सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.

एका राष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार आयकर विभागाने नांदेड येथे १० मे रोजी पहाटेच फायनान्स व्यवसायात प्रसिद्ध असलेल्या भंडारी बंधूंच्या घरी, कार्यालयावर धाड टाकली. या धाडीत नाशिक येथील आयकर विभागाचे जवळपास ८० अधिकारी सहभागी झाले होते.  अक्षयतृतीयेच्या दिवशीच पडलेल्या या धाडीमुळे  नांदेडमध्ये खळबळ उडाली होती. आयकर  विभागाची ही कारवाई दोन दिवस चालली. या कारवाईत प्रारंभी तपास अधिकाऱ्यांना केवळ कागदपत्रे हाती लागले. मात्र प्राप्त माहितीनुसार अपेक्षित साध्य होत नसल्याने पथकातील अधिकाऱ्यांनी दुसऱ्या भावाच्या घरावर छापा टाकला.  त्यावेळी बेडवरील एका गादीमध्ये  रोकड लपवून ठेवल्याचे स्पष्ट उघडकीस आले. भंडारी बंधूंनी जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायातून ही बेहिशेबी संपत्ती जमा केल्याचे निष्पन्न झाले आहे.  त्यांची खाजगी फायनान्स कंपनी आहे. त्याचवेळी आठ नातलगांच्या नावावर वेगवेगळे व्यवसाय सुरू केले आहेत. या सर्व व्यवसायामध्ये भंडारी बंधूकडून मोठ्या प्रमाणात रोखीने व्यवहार होत असत त्यातून आयकर चुकवल्याच्या संशयावरून ही धाड टाकण्यात आली होती. या छाप्यात आयकर विभागाने जप्त केलेली  रोकड मोजण्यासाठी नांदेड एसबीआय शाखेतील कर्मचाऱ्यांना १४ तास लागले. सकाळी दहा ते रात्री बारा वाजेपर्यंत नोटांची मोजणी सुरू होती.

गादीमध्ये सापडले कुबेराचे भंडार…आयकर विभागाने केलेल्या या कारवाईत तब्बल १७० कोटींच्या बेहिशेबी  मालमत्तेचे दस्तऐवज जप्त केले आहेत. त्यात १४ कोटींची रोकड, सात कोटींचे बारा किलो सोन्याचे दागिने, या दागिन्यांमध्ये हिरे, ५० हून अधिक सोन्याची बिस्किटे आहेत.  व्यवसायिक भंडारी बंधूंच्या वेगवेगळ्या सात आस्थापनांमधील कागदपत्रे, सीडी हार्ड डिस्क आणि पेनड्राईव्ह मध्ये १७० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!