क्राईम

नांदेड ग्रामीण पोलिसांची भनगी येथे वाळू माफियांवर कारवाई, लिंबगाव पोलिसांनीही जप्त केला ४ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त

सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, साडे सहा लाखांचे साहित्य केले नष्ट

नांदेड- नांदेड ग्रामीण पोलिसांकडून अवैध वाळूमाफियाविरुद्ध धडक कारवाई सुरूच आहे. वाळू माफीयांचा मुख्य अड्डा असलेल्या भनगी येथे २० ऑक्टोबर रोजी गोदावरी नदीतून वाळू उपसा करणाऱ्या पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत नांदेड ग्रामीण पोलिसांनी १५ ब्रास रेती जप्त केली तर १३ तराफे नष्ट करण्यात आले आहेत. लिंबगाव पोलिसांनीही आज मंगळवारी सायाळ येथे अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पकडला आहे.

भनगी येथे अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड व पथकातील इतर सहकाऱ्यांना मिळाली. या पथकाने तेथे धाड टाकली त्यावेळी भनगी येथे तराफ्याद्वारे वाळू उपसा करून तो काठावर साठा केला जात होता. पोलिसांनी यावेळी १५ ब्रास रेती जप्त केली आहे. त्याचवेळी गोदावरी नदीपात्रातून रेती काढण्याचे १३ तराफे जाळून नष्ट केले आहेत. या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी संदीप मोरे, निलेश मोरे, आदिनाथ मोरे, अनिल मोरे, अविनाश मोरे सर्व रा. भनगी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड, पोहेकॉ वसंत केंद्रे, पो. कॉ. विष्णू कल्याणकर, संतोष पवार, कंगलवाड यांनी केली आहे.

लिंबगाव पोलिसांनी पकडला अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर..! लिंबगाव ठाणे हद्दीतही सायाळ येथे रेतीची अवैध वाहतूक करणारा एमएच २६ एच ९०१६ क्रमांकाचा टिप्पर २१ ऑक्टोबर रोजी पहाटे २ च्या सुमारास पकडला. या टिपरमध्ये दोन ब्रास रेतीही होती. पोलिसांनी या कारवाईत एकूण ४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात हरी सटवाजी धुमाळ या चालकाविरुद्ध लिंबगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली लिंबगाव  ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनकर, पोलीस उपनिरीक्षक एन. एम. सय्यद, पोहेकॉ तेलंग, पोहेकॉ काझी यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!