क्राईम

नांदेडमध्ये हाय प्रोफाईल जुगार अड्डयावर धाड 

हॉटेल सिटी सिम्फनी येथे विमानतळ पोलिसांची कारवाई, नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, रोख १ लाख १४ हजार ४७० रुपये जप्त

नांदेड – जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध प्रकारच्या अवैध धंद्यावर नूतन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी घाव घालण्यास प्रारंभ केला असतानाच आता हाय प्रोफाईल अवैध धंदेही पुढे येत आहेत. नांदेड शहरातील नमस्कार चौक भागातील हॉटेल सिटी सिम्फनी येथे सुरू असलेल्या जुगार अड्डयावर धाड टाकून विमानतळ पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या धाडीत १ लाख १४ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नांदेड पोलीस परिक्षेत्रात पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. इतकेच नाही तर हे अवैध धंदे बंद करण्यासाठी वेगवेगळ्या पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांची जबाबदारी त्या त्या जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांकडे सोपविण्यात आली आहे. या पथकांकडून मोठ्या प्रमाणात कारवायाही केल्या जात आहेत.

नांदेड जिल्ह्यातही उपमहानिरीक्षक उमाप यांच्या आदेशानंतर नूतन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यावर धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. याच आदेशानुसार विमानतळ ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण यांनी गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक साने, पोहेकॉ राठोड, पोहेकॉ, पठाण, पोकॉ माने, पोकॉ स्वामी, सुखई, शोएब, पोलीस उपनिरीक्षक भोसीकर, पोकॉ साईप्रसाद सोनसळे आदींनी २३ ऑगस्ट रोजी अवैध धंद्याची माहिती कारवाईसाठी माहिती घेत होते. यावेळी गुप्त बातमीदारामार्फत या पथकाला माहिती मिळाली की नमस्कार चौक भागातील हाय प्रोफाईल हॉटेल सिटी सिम्फनी येथे जुगार सुरू आहे. त्यावेळी या पथकाने येथे धाड टाकून जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना ताब्यात घेतले. यामध्ये गोविंदा नरेंद्र जग्याशी, सय्यद स.अख्तर स.नसीर, यज्ञेश लक्ष्मीकांत भोकरकर, वीरसिंग दिलीपसिंग ठाकुर, अरुण नागनाथ सोनटक्के, हुसेन सुनील जग्याशी, शेख असिफ शेख बाबू, दिनेश पद्माकर चिटमलवार आणि उद्धव भानुदास टोम्पे या नऊ जणांचा समावेश आहे. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य आणि १ लाख १४ हजार ४७० रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक, पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपरोक्त गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पार पाडली आहे. पोलिसांना आता जिल्ह्यात अशा हाय प्रोफाईल अवैध धंद्याची माहिती शोधून काढावी लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!