क्राईम

नांदेडमध्ये अनधिकृत मोबाईल टॉवरची उभारणी केल्याप्रकरणी जागामालकावर गुन्हा दाखल 

भाग्यनगर ठाण्यात महापालिका क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी दिली तक्रार, नोटीसनंतरही सुरूच ठेवले होते काम

नांदेड – शहरातील तरोडा बु. भागातील देशमुखनगरी येथे मोबाईल टॉवरचे विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी भगवानराव कोंडीबा देशमुख याच्याविरुद्ध भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

भगवानराव देशमुख यांनी आपल्या गट न.३०० देशमुखनगरी येथे विनापरवानगी मोबाईल टॉवरचे काम सुरू केले होते. त्या भागाचे इमारत निरीक्षक यानी याबाबत विचारणा केली असता कोणतीही परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मनपाकडून सदर कामाचा पंचनामा करण्यात आला. नोटीस बजावण्यात आली. तरीही देशमुख यांनी मोबाईल टॉवरचे काम थांबविले नाही. २१ ऑगस्टपासून सुरू केलेले हे काम ८ सप्टेंबरपर्यंत सुरूच होते. त्यामुळे याप्रकरणी क्षेत्रिय अधिकारी नीलावती किशन डावरे यांनी भाग्यनगर ठाण्यात तक्रार दिली.

या तक्रारीवरून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२ नुसार भगवानराव देशमुखविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!