राजकीय

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची नांदेड येथे शुक्रवारी जाहीर सभा

नवा मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर होणार सभा

नांदेड – नांदेड लोकसभा मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची १९ एप्रिल रोजी नांदेड येथे नवा मोंढा येथील मैदानावर दुपारी १ वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणूक दुसऱ्या टप्पात आली आहे. अनेक दिग्गज राजकीय मंडळीच्या प्रचार सभेने मैदाने गाजवली जात आहेत. यातच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांच्या प्रचारार्थ  ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची दि.१९ एप्रिल रोजी नवा मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर दुपारी १ वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेबाबत आज बुधवारी वंचित बहुजन आघाडीचे  उमेदवार अविनाश भोसीकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालमकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, महासचिव श्याम कांबळे,  अक्षय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.  या सभेला लाखोच्या संख्येने जनता उपस्थिती राहतील असा आशावाद वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आला आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!