प्रशासकीय

नांदेड जिल्ह्यात यावर्षीच्या स्थानिक सुट्ट्या जाहीर 

माळेगाव यात्रा, कंधारचा उर्स व ज्येष्ठा गौरी पूजनाची राहणार सुट्टी, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घोषित केल्या स्थानिक सुट्ट्या

नांदेड – जिल्ह्यातील २०२५ च्या तीन स्थानिक सुट्ट्या जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घोषित केल्या आहेत. शासन निर्णयाद्वारे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार २०२५ या वर्षाकरिता नांदेड जिल्ह्यात या स्थानिक सुट्ट्या घोषित करण्यात आल्या आहेत.

घोषित करण्यात आलेल्या या सुट्ट्यांमध्ये १७ जानेवारी ही पहिली स्थानिक सुट्टी कंधारच्या हजरत हाजी सय्याह सरवरे मगदुम बडी दर्गाह ऊर्सची राहणार आहे तर दुसरी सुट्टी १ सप्टेंबर २०२५ रोजी ज्येष्ठा गौरी पूजनाची राहणार आहे.  तिसरी आणि शेवटची स्थानिक सुट्टी ही माळेगाव येथील श्रीक्षेत्र खंडोबा यात्रेची राहणार आहे. १८ डिसेंबर २०२५ रोजी ही स्थानिक सुट्टी घोषित करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घोषित केलेल्या या तीन स्थानिक सुट्ट्या नांदेड जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालय, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालय, महानगरपालिका, नगरपालिका कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालय, कोषागार व उपकोषागार कार्यालय आणि इतर शैक्षणिक संस्था यांना लागू राहील. हा आदेश नांदेड जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालय तसेच केंद्र शासनाची कार्यालय आणि बँकांना लागू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!