
नांदेड – नांदेड लोकसभेसाठी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील मतमोजणी केंद्रात सकाळी साडेआठ वाजता पोस्टल मत मोजणीला सुरुवात झाली आहे. तर उमेदवारांच्या उपस्थितीत विधानसभा क्षेत्रातील स्ट्रॉंग रूम उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून भोकर, नांदेड दक्षिण, देगलूर, नायगाव विधानसभा क्षेत्राच्या स्ट्रॉंग रूम उघडण्यात आल्या आहेत.
लोकसभेसाठी थोड्याच वेळात स्ट्रॉंग रूम उघडण्याची प्रक्रिया सुरू होईल. सर्वप्रथम पोस्टल मतांची मोजणी करण्यात येत आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील मतमोजणी केंद्रात ही प्रक्रिया सुरू आहे. नांदेड लोकसभा व विधानसभेसाठी १ हजार ८०० कर्मचारी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील मतमोजणी केंद्रात नियुक्त करण्यात आले आहेत. विधानसभेच्या मतमोजणीच्या प्राथमिक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.