राजकीय

नांदेडमध्ये महायुतीचा विधानसभेच्या सर्वच नऊ जागांवर झेंडा..! 

चुरशीच्या झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत मात्र काँग्रेसची सरशी, विधानसभा निवडणुकीत भाजपचे ५, शिवसेनेचे ३ तर राष्ट्रवादी काँग्रेसचा १ उमेदवार विजयी  

नांदेड:-   जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात महायुतीने एकतर्फी विजयाचा झेंडा फडकवत नवा इतिहास रचला आहे. महायुतीने सर्वच जागांवर विजय मिळवत जिल्ह्यात महाविकास आघाडीला पूर्णपणे निष्प्रभ ठरवले आहे. दुसरीकडे चुरशीच्या झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत मात्र काँग्रेसने मतमोजणीच्या शेवटच्या फेरीत बाजी मारली आहे. १ हजार ४५७ मतांनी मिळालेला हा एकमेव विजय काँग्रेसला दिलासा देणारा ठरला असला तरी विधानसभा निवडणुकीतील झालेले पानिपत महाविकास आघाडीसाठी चिंतनाची बाब ठरली आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या भोकर विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार ॲड. श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिरूपती उर्फ पप्पु बाबुराव कदम कोंढेकर यांचा ५० हजार ५५१ मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये ॲड. श्रीजया चव्हाण यांना १ लाख ३३ हजार १८७  मते मिळाली तर तिरूपती उर्फ पप्पु बाबुराव कदम कोंढेकर यांना ८२ हजार ६३६ मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश टिकाराम राठोड यांना ८ हजार ८७२ अशी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर बहुजन समाज पार्टीचे कमलेशकुमार पांडूरंगराव चौदंते यांना १ हजार ६६४ असे चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
जिल्ह्यात दुसरा लक्षवेधी मतदारसंघ ठरलेल्या लोहा विधानसभा मतदारसंघात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे एकनाथ रावसाहेब पवार यांचा १० हजार ९७३ मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर यांना ७२ हजार ७५० मते मिळाली तर एकनाथ रावसाहेब पवार यांना ६१ हजार ७७७ मते मिळाली आहेत. जनहित लोकशाही पार्टीचे उमेदवार चंद्रसेन ईश्वरराव पाटील (सुरनर) यांना २९ हजार १९४ तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर प्रा. मनोहर बाबाराव धोंडे यांना २० हजार ३०२ चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांनी पुन्हा एकदा विजय मिळविला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अब्दुल सत्तार अ. गफुर यांचा ३ हजार ५०२ मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये बालाजी कल्याणकर यांना ८३ हजार १८४ मते मिळाली तर अब्दुल सत्तार यांना ७९ हजार ६८२ मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत विराज इंगोले यांना २४ हजार २६६ इतकी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगीता विठ्ठल पाटील यांना २२ हजार ७०६ इतकी चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
नांदेड दक्षिण विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार आनंद शंकर तिडके यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मोहनराव हंबर्डे यांचा २ हजार १३२ मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये आनंद शंकर तिडके यांना ६० हजार ४४५ मते मिळाली तर मोहनराव हंबर्डे यांना ५८ हजार ३१३ मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फारुक अहमद यांना ३३ हजार ८४१ अशी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर दिलीप कंदकुर्ते यांना १७ हजार १७० इतकी चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
किनवट विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार भिमराव रामजी केराम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे जाधव प्रदीप नाईक यांचा ५ हजार ६३६ मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये भिमराव रामजी केराम यांना ९२ हजार  ८५६ मते मिळाली तर जाधव प्रदीप नाईक यांना ८७ हजार २२० मते मिळाली आहेत. यामध्ये उमेदवार  सचिन माधवराव जाधव (नाईक) यांना ५ हजार ५११ इतकी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर चौथ्या क्रमांकावर अशोक संभाजीराव ढोले यांना ५ हजार ३११ मते मिळाली आहेत.
हदगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांचा ३० हजार ६७ मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये बाबुराव कदम कोहळीकर यांना १ लाख १३ हजार २४५  मते मिळाली तर माधवराव पाटील जवळगावकर यांना ८४ हजार १७८ मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप आला राठोड यांना ११ हजार  ४०९ मते मिळाली तर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार माधव देवसरकर  यांना १ हजार २७४ अशी चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
नायगाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे राजेश संभाजीराव पवार यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार डॉ. मीनल पाटील खतगावकर यांचा ४७ हजार ६२९  मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये राजेश संभाजीराव पवार यांना १ लाख २९ हजार १९२ मते मिळाली तर डॉ. मीनल पाटील खतगावकर यांना ८१ हजार ५६३ मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. माधव संभाजीराव विभुते यांना १६ हजार ४३ इतकी क्रमांकाची मते मिळाली तर प्रहार जनशक्ती पार्टीचे गजानन शंकरराव चव्हाण यांना २ हजार १४४ इतकी चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
देगलूर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जितेश रावसाहेब अंतापूरकर यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार निवृत्ती कोंडीबा कांबळे सांगवीकर यांचा ४२ हजार ९९९  मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये जितेश रावसाहेब अंतापूरकर यांना १ लाख ७ हजार ८४१ मते मिळाली तर निवृत्ती कोंडीबा कांबळे सांगवीकर यांना ६४ हजार ८४२ मते मिळाली आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार सुभाष साबणे यांना १५ हजार ९१९ अशी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार  सुशिलकुमार देगलुरकर यांना ५ हजार  ४०३ चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
मुखेड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे डॉ. तुषार राठोड यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचा ३७ हजार ७८४  मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये डॉ. तुषार राठोड यांना ९८ हजार २१३ मते मिळाली तर हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांना ६० हजार ४२९ मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार बालाजी नामदेव खतगावकर यांना ४८ हजार २३५ इतकी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रावसाहेब दिगांबरराव पाटील यांना ४ हजार ७०० इतकी चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!