
नांदेड- मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्नित नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सन २०२५-२६ या कालावधीतील सदस्य नोंदणी १३ जानेवारी पासून सुरू झाली आहे. ३१ जानेवारीपर्यंत सदस्य नोंदणी सुरू राहणार आहे. पत्रकारांनी वेळेत सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष संतोष पांडागळे यांनी केले आहे.
संबंधितांनी सदस्य नोंदणीचा अर्ज भरून त्यावर रंगीत आकाराचा पासपोर्ट फोटो लावावा. सोबत ज्या माध्यम समूहाचे काम करत असल्यास त्यांचे चालू वर्षाच्या ओळखपत्राची झेरॉक्स सोबत जोडावी. तसेच नविन सभासदांना ३५० रुपये तर जुन्या सभासदांना ३०० रुपये सदस्य नोंदणी शुल्क आकारली जाणार आहे. इतर संघटनांचे पदाधिकारी व सदस्य यांना सदस्य व्हायचे असल्यास त्यांना त्या संघटनेचा राजीनामा देऊन सदस्य होता येणार आहे. सदस्य नोंदणीचा अर्ज शुल्क भरून दिल्यानंतर सदस्यत्व बहाल करण्यासंदर्भातला निर्णय मराठी पत्रकार परिषद व जिल्हा संघाकडे राखून ठेवण्यात आलेला आहे.
सदरील नोंदणी दि.३१ जानेवारी २०२५ पर्यंत करावयाची आहे.त्यानंतर नोंदणीसाठी मुदतवाढ दिल्या जाणार नाही.
सदस्य नोंदणीचे अर्ज दैनिक सत्यप्रभा कार्यालय पेट्रोल पंपाच्या बाजूला आयटीआय जवळ, नांदेड येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व माध्यम प्रतिनिधींनी सदस्य नोंदणीसाठी दैनिक सत्यप्रभा कार्यालयात वितरण व्यवस्थापक गणपत बनसोडे (भ्रमणध्वनी क्रमांक ९१४५२१०७४८ )यांच्याशी संपर्क करावा व नोंदणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांनी केले आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे नूतन जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.