महापालिका

नांदेड महापालिका अनधिकृत बॅनर प्रकरणी ॲक्शन मोडवर..!

संपूर्ण शहरात एकाच दिवशी अनधिकृत बॅनर काढण्याची मोहिम सुरू, महापालिका आता बॅनरचे दरही कमी करणार 

नांदेड – शहरात लागणाऱ्या अनधिकृत बॅनरवर अंकुश लावण्यासाठी महापालिका पुन्हा एकदा सरसावली आहे. गुरुवारी एकाच दिवशी शहरातील सहा क्षेत्रिय कार्यालयात बॅनर हटाव मोहिम हाती घेतली आहे. शहरात १०० हून अधिक बॅनर हटविण्यात आले आहेत. आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनी ही मोहीम सुरू केली आहे. शहरात एकही अनधिकृत बॅनर लावू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शहरात बॅनर लावण्यासाठी भरावे लागणारे शुल्क अधिक असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात बॅनर प्रिंटर्स संचालक, प्रिंटर्स असोसिएशनची गुरुवारी बैठकही घेण्यात आली आहे. शहरात बॅनर लावण्याच्या स्थळांची संख्याही वाढविण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी शहरात २४ डिसेंबर रोजी अनधिकृत बॅनरला अभय देणाऱ्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांना दंड ठोठावला होता. त्यामुळे पुन्हा एकदा मनपा अधिकारी सतर्क झाले. शहरात अनधिकृत बॅनरची संख्या वाढत असल्याचे निदर्शनात येताच उपायुक्त संधू यांनी क्षेत्रिय अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बॅनर लावणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. गुरुवारी एकाच दिवशी शहरात अनधिकृत बॅनर काढण्याची मोहिम हाती घेण्यात आली. शहरात १०० हून अधिक बॅनर हटविण्यात आले आहेत. महापालिकेने हाती घेतलेल्या या अनधिकृत बॅनर हटाव मोहिमेमुळे विनापरवानगी बॅनर लावणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यातही प्रामुख्याने शहरात राजकीय बॅनरची संख्या अधिक आहे.
महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी आपल्या प्रारंभीच्या काळात शहरातील अनधिकृत बॅनरला मोठ्या प्रमाणात आळा घातला होता. अनधिकृत बॅनर लावणाऱ्याविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात आले होते. मात्र पुढे राजकीय प्रभावाखाली ही अनधिकृत बॅनर विरुद्धची मोहीम काही अंशी गुंडाळण्यातच आली. त्यातच पुढे निवडणुकाही आल्या. त्या निवडणुकांचा निकाल आल्यानंतरही मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी झाली.
महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी आपल्या प्रारंभीच्या काळात शहरातील अनधिकृत बॅनरला मोठ्या प्रमाणात आळा घातला होता. अनधिकृत बॅनर लावणाऱ्याविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात आले होते. मात्र पुढे राजकीय प्रभावाखाली ही अनधिकृत बॅनर विरुद्धची मोहीम काही अंशी गुंडाळण्यातच आली. त्यातच पुढे निवडणुकाही आल्या. या निवडणूक निकालानंतर काही प्रमाणात बॅनरबाजी झाली मात्र आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी या बॅनरबाजीला अभय देणाऱ्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांवरच दंडात्मक कारवाई केल्यानंतर पुन्हा शहरात अनधिकृत बॅनरबाजीवर कारवाई सुरू झाली आहे. आज गुरुवारी २३ जानेवारी रोजी शहरातील सर्वच झोनमध्ये अनधिकृत बॅनरविरुद्ध कारवाई करण्यात आली.
दरम्यान, शहरात बॅनरच्या स्थळांची संख्या वाढविणे, बॅनर शुल्क निश्चित करणे याबाबत आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी शहरातील प्रिंटर्स असोसिएशनची बैठक घेण्यात आली. या बैठकीत बॅनर फलक लावण्यासंदर्भातील दर कमी करण्याबाबत आणि बॅनर बसवण्याच्या स्थळांची संख्या वाढवण्याबाबत चर्चा करण्यात आली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगण्यात आले. या बैठकीस उपायुक्त अजितपाल सिंघ संधू यांचीही उपस्थिती होती.

शहरात जाहिरात फलक लावण्यासाठी ११८ ठिकाण निश्चित करण्यात आली आहेत. जाहिरात परवानगीही ऑनलाईन प्रणालीद्वारे त्वरित उपलब्ध करून दिली जात आहे. तसेच महानगरपालिका हद्दीमध्ये कोणीही विनापरवानगी जाहिरात केल्यास त्याबाबत टोल फ्री क्रमांक १८००२३३४४९४९ वर तक्रार नोंदविण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही परवानगीशिवाय जाहिरात फलक लावू नये अन्यथा मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिका क्रमांक १५५/ २०११ मधील न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरता अधिनियम १९९५ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनी स्पष्ट केले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!