
नांदेड – मराठी पत्रकार परिषद मुंबई, परभणी जिल्हा मराठी पत्रकारसंघ व सेलू तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने आयोजित आदर्श जिल्हा व तालुका पुरस्कार वितरण तसेच पत्रकार मेळावा दि. १ फेब्रुवारी रोजी परभणी जिल्ह्यातील सेलू येथे आयोजित केला आहे. या मेळाव्यास नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांनी व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
सेलू येथील साई मंगल कार्यालयात दि.१ फेब्रुवारी रोजी सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख हे राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर व सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, उपाध्यक्ष गोपी लांडगे, गणेश मोकाशी, हेमंत वनजू, अविनाश भांडेकर, चंद्रकांत बरदे, विभागीय सचिव दिपक कैतके, पी.पी.कुलकर्णी, रवी उबाळे, प्रदिप घुमटवार, शिखरचंद बागरेचा, मनोज खांबे, सचिन शिवशेट्टे, अमोल खरे, चंद्रकांत क्षीरसागर, राज्य प्रसिध्दी प्रमुख संदीप कुलकर्णी, सहायक राज्य प्रसिध्दी प्रमुख भरत निगडे, राज्य महिला आघाडी प्रमुख शिवभा जयपूरकर, डिजीटल मिडिया परिषदेचे राज्यप्रमुख अनिल वाघमारे, डिजीटल मिडिया परिषद कार्याध्यक्ष सनी शिंदे, डिजीटल मिडिया प्रमुख परिषद उपाध्यक्ष अनिल उंबरकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या मेळाव्यास नांदेड जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी सेलू येथे सकाळी ९.३० वाजता उपस्थित राहून परिषदेने आयोजित केलेल्या एकता रॅलीस सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, पत्रकार अधिस्वीकृती समितीचे विभागीय अध्यक्ष विजय जोशी, परिषदेचे माजी सरचिटणीस चारुदत्त चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, माजी जिल्हाध्यक्ष ॲड.प्रदीप नागापूरकर, महानगरचे माजी कार्याध्यक्ष अनिल कसबे, माजी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण भवरे, परिषदेचे जिल्हा प्रसिध्दी प्रमूख ॲड.दिगांबर गायकवाड, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक रवी संगनवार, माजी प्रदेश प्रतिनिधी सुभाष लोणे, राम तरटे, नरेश दंडवते, बजरंग शुक्ला, राजेश शिंदे यांच्यासह नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांनी केले आहे.