Police

नांदेडमध्ये थेट पोलीस मुख्यालयातही झळकले राजकीय बॅनर..! 

शहरात बॅनर हटाव मोहीम राबवणारे नांदेड महापालिकेचे क्षेत्रिय अधिकारी दोन दिवसापासून झाले गायब..!

नांदेड – नांदेड शहरातील बॅनरबाजीला लगाम घालण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न होत असल्याचे महापालिका सांगत आहे. परंतु गेल्या दोन दिवसापासून शहरात ठिकठिकाणी विनापरवानगी राजकीय बॅनर लावले आहेत. त्यातच कहर म्हणजे आज प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यानिमित्त थेट पोलीस मुख्यालयातही राजकीय बॅनर झळकल्याने आता बॅनरबाजांची हिम्मत नेमकी कुठपर्यंत पोहोचली आहे, हे स्पष्ट होत आहे. या अवैध बॅनरबाजीवर आता आळा घालणार कोण हा प्रश्नही पुढे येत आहे.

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री पद इतर मागास बहुजन कल्याण दुग्धविकास अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्याकडे सोपवण्यात आले. पालकमंत्री सावे हे पहिल्यांदाच भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी २५ जानेवारी रोजी संध्याकाळी नांदेडमध्ये दाखल झाले. त्यांच्या स्वागताचे शहरात ठिकठिकाणी बॅनर झळकले महापालिकेने दोन दिवसांपूर्वीच शहरात अनधिकृत बॅनर हटाव मोहीम राबवत एक कठोर संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या संदेशाला दोन दिवसातच राजकीय खीळ बसली आहे. कारण सत्ताधारी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून संपूर्ण शहरभर लावलेले बॅनर हटविण्याची जबाबदारी त्या त्या क्षेत्रिय कार्यालयाच्या प्रमुखांना गेल्या दोन दिवसात पार पाडता आली नाही. महापालिकेच्या वरिष्ठ स्तरावरून अवैध बॅनर पाठविण्याचे कायम आदेश असले तरीही काही ठराविक वेळेत मात्र या आदेशाचे पालन होत नसल्याचे शहरवासियांच्या वारंवार निदर्शनात येत आहे. त्यामुळे एरवी सामान्य नागरिकांकडून तसेच किरकोळ संघटनांकडून लावण्यात आलेले बॅनर काढण्यासाठी क्षेत्रिय अधिकारी स्पर्धा करत असतात.  मात्र सत्ताधारी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात आलेले बॅनर काढण्याची तसदी या अधिकाऱ्यांना घेता येऊ शकत नाही. त्यामुळे इतर वेळी सामाजिक विषयाचे बॅनर तरी कशाला काढायचे असा संतप्त सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून नांदेडकर विचारत आहेत. अशावेळी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही मौनच बाळगले जाते, ही बाबही आता शहरवासियांच्या नजरेतून सुटली नाही. त्यामुळे बॅनर बाबतीत तरी महापालिकेकडून केला जात असलेला भेदभाव प्रजासत्ताक दिनी नांदेडकरांच्या स्पष्टपणे नजरेस आला आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यावर लागलेल्या बॅनरचा हा विषय नेहमीचाच असला तरीही प्रजासत्ताक दिनी मात्र नांदेडमध्ये आता राजकीय मंडळींनी थेट पोलीस मुख्यालयातही आपली घुसखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा हा पोलीस कवायत पोलीस मुख्यालयातील श्री छत्रपती शिवाजी महाराज कवायत मैदानावर होतो. या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारातच थेट मुख्यालयामध्ये पालकमंत्री अतुल सावे यांच्या स्वागताचे बॅनर झळकत होते. पोलीस मुख्यालयाच्या या प्रवेशद्वारावर २४ तास बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी कर्मचारी असतात त्यांच्या उपस्थितीत हे बॅनर लागले यात शंकाच नाही. पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारात हे बॅनर पाहून शहरातील अनेक नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. पोलीस मुख्यालयासारख्या प्रशासकीय इमारतीमध्ये राजकीय बॅनर लावू कसे दिले हा प्रश्नही त्यांच्या मनात उद्भवला;  मात्र सत्ताधारी राजकीय मंडळीच्या आले मना तेथे कोणाचे काही चालेना अशीच आज नांदेडची परिस्थिती आहे. महापालिकेच्या पाऊलावरच पाऊल ठेवत आता नांदेड पोलिसांनीही मौन बाळगण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय बॅनर आता थेट प्रशासनाच्या कक्षापर्यंत आले नाही म्हणजे मिळवले… त्याचवेळी प्रशासकीय काळातही महापालिकेवर असलेला राजकीय दबाव आता जिल्हा पोलीस दलावरही असल्यासारखी परिस्थिती आज तरी नांदेडमध्ये निर्माण झाली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!