प्रशासकीय

वाघाळा येथील आश्रमशाळेतील अन्नातून झालेल्या विषबाधा प्रकरणी संस्थाचालक, मुख्याध्यापक, अधीक्षकाला नोटीस 

घटनेची सखोल चौकशी केली जाणार, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर, आज रविवारी रुग्णालयातून मुलांना मिळणार डिस्चार्ज

नांदेड – नवीन नांदेडातील वाघाळा येथील माताजी शिक्षण संस्था संचालित महात्मा फुले प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत अन्नातून झालेल्या शाळेच्या विषबाधाप्रकरणी संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि अधीक्षकाला नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, बाधित विद्यार्थ्यांची प्रकृती आता पूर्णत: धोक्याबाहेर आहे. विद्यार्थ्यांना आज रविवारी रुग्णालयातून सोडण्यात येणार असल्याची असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मिनगिरे यांनी दिली. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

नवीन नांदेडातील वाघाळा येथील माताजी शिक्षण संस्था संचलित महात्मा फुले प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत शनिवारी विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या विद्यार्थ्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. डॉक्टरांनाही आवश्यक त्या सूचना दिल्या. आश्रमशाळेत घडलेल्या या घटनेची गंभीर दखल घेत समाजकल्याण विभागाने आश्रम शाळेचे संस्थाचालक आणि मुख्याध्यापक भगवान बाबाराव इंगेवाड तसेच अधीक्षिका रंजना लक्ष्मण इंगेवाड यांना नोटीस बजावली आहे.

आश्रम शाळेतील निवासी ८-१० विद्यार्थ्यांना शनिवारी सकाळी ९ वा. जेवण केल्यानंतर उलटी व मळमळ होत असल्याचे जाणवले. या विद्यार्थ्यांना लगेच नांदेड येथील शासकीय वैद्यकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आश्रमशाळेतील शिक्षकांनी सर्व ५९ विद्यार्थ्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालय विष्णपुरी नांदेड येथे दाखल केले आहे. या विद्यार्थ्यांची इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक शिवानंद मिनगीरे यांनी भेट घेऊन प्रकृतीबाबत संबंधित डॉक्टरांशी प्रत्यक्ष चर्चा केली. विद्यार्थ्यांची प्रकृती सुस्थितीत असून त्यांना आज रविवारी रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे, अशी माहिती मिनगिरे यांनी दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!