क्राईम

वाजेगाव बंधाऱ्याजवळील स्फोटातील जखमी दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू ,पोलिसांनी दिली अधिकृत माहिती

त्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे अद्यापही पोलिसांसमोर आव्हान, घटनास्थळावर संशयास्पद वस्तू आढळल्याने घटनेची तीव्रता वाढली

नांदेड – नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील वाजेगाव बंधाऱ्याजवळ दुचाकीच्या स्फोटात जखमी झालेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या स्फोटातील मयताची अद्याप ओळख पटली नसल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेचा सखोल तपास केला जात असल्याचेही गुरव म्हणाले. घटनास्थळी काही संशयास्पद वस्तू आढळल्याने या घटनेची तीव्रता वाढली असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

नवीन नांदेडमधील वाजेगाव बंधाऱ्याजवळ शनिवारी सकाळी साडे नऊ वाजेदरम्यान एक व्यक्ती दुचाकीच्या स्फोटात गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आली असल्याची माहिती नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी एका व्हिडिओ संदेशादरे दिली होती; मात्र या घटनेने आता वेगळेच वळण घेतले आहे. घटनास्थळी मिळालेल्या काही संशयास्पद वस्तू पाहता हा प्रकार घातपाताचा होता की काय या अनुषंगानेही पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी या तपासावर लक्ष ठेवून आहेत.

आज शनिवारी सकाळी सर्वत्र रमजान ईदची नमाज अदा करण्यात व्यस्त होते. त्याचवेळी साडेनऊ वाजेदरम्यान स्फोटाचा हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेबाबत अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी सांगितले, सकाळी साडेनऊ वाजता दुचाकीच्या सस्फोटाची घटना घडली. या घटनेत दुचाकीवरील व्यक्ती गंभीररीत्या जळाला होता. त्याला रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू त्याचा मृत्यू झाला. दुसरीकडे त्याची ओळख अद्यापही पटली नाही. त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. या घटनेबाबत अधिक माहिती लवकरच देण्यात येईल असेही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!