क्राईम

नांदेडमध्ये डिजिटल अरेस्टची भीती दाखवत प्राध्यापकाला ५१ लाखाला गंडविले..!

टेरर फंडिंगसह मनी लॉंडरिंगचा केला गंभीर आरोप, वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, सुजल रॉय यांची ओळख असल्याचे सांगून दाखवली अटकेची भीती 

नांदेड – जुना कौठा येथील बसवेश्वरनगर भागात राहणाऱ्या एका प्राध्यापकाला टेरर फंडिंगसह मनी लॉंडरिंग करत असल्याची भीती दाखवून डिजिटल अरेस्ट करण्याची धमकी देत सायबर ठगांनी तब्बल ५१ लाख ४३ हजार ८५६ रुपयांना गंडविले असल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्राध्यापकाने दिलेल्या तक्रारीवरून नांदेड सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवीन नांदेडातील जुना कौठा, बसवेश्वर नगर येथील प्रा. मोहन लक्ष्मणराव घईनवाड यांना १७ जुलै ते २४ जुलै या कालावधीत सायबर ठगांनी संगणमत करून पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी विश्वास नांगरे पाटील, प्रदीप जयस्वाल, सुजल रॉय, डेटा प्रोडक्शन बोर्ड मुंबईचे कार्तिक यादव, आर. के. चौधरी  यांची ओळख असल्याचे सांगितले. ‘तुम्ही मनी लॉन्ड्रीगसह टेरर फंडिंग करत आहात, असा गंभीर आरोप त्यांच्यावर केला. याच कारणावरून प्रा. घईनवाड यांना सायबर ठगांनी डिजिटल अरेस्ट करण्याची भीती दाखवली. या भीतीपोटी त्यांच्याकडून तब्बल ५१ लाख ३३ हजार ८५६ रुपये ऑनलाईन पद्धतीने उकळण्यात आले. आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच प्रा. घईनवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड सायबर सेल येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सायबर सेलचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे हे करीत आहेत.

नांदेडमध्ये भामटे पोलीसही सक्रिय, वृद्धांना केले जात आहे लक्ष्य..! नांदेडमध्ये गेल्या काही दिवसापासून भामटे पोलीस नागरिकांना लुबाडत असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. नांदेड ग्रामीण, तामसा, लोहा आदी ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. या भामट्या पोलिसांचा तपास करण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. सिडको येथील एलआयसी ऑफिस आणि वसरणी ओव्हर ब्रिज येथे दोन अनोळखी इसमानी २४ जुलै रोजी आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी केली. यातील चंद्रकांत हनुमंतराव नक्कावार आणि प्रदीपसिंग गोविंदसिंग ठाकूर यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या किंमत ६५ हजार रुपये घेऊन त्यांनी पोबारा केला. या प्रकरणी या दोन वृद्धांना लुबाडल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ यालावार हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!