महापालिका

नांदेडमध्ये जागतिक आरोग्य दिनापासून महापालिका रुग्णालयात मोफत बाह्य रुग्ण सेवेस प्रारंभ

मनपा अर्थसंकल्पातील घोषणांची पहिल्या आठवड्यापासून पूर्तता करण्यास प्रारंभ 

नांदेड :- केंद्र आणि राज्य सरकारकडून सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात विविध घोषणा केल्या जातात. मात्र त्या घोषणांची पूर्तता कितपत होते, हा संशोधनाचा विषय असला तरी नांदेड महापालिकेने मात्र २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांची पूर्तता करण्यास आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच प्रारंभ केला आहे. महापालिकेने घोषित केलेल्या मोफत बाह्य रुग्ण सेवेला जागतिक आरोग्य दिनापासून प्रारंभ झाला आहे. महापालिकेच्या सर्व रुग्णालयात आता मोफत बाह्य रुग्णसेवा उपलब्ध होणार आहे. शिवाजीनगर येथील महापालिकेच्या रुग्णालयात आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते या मोफत रुग्ण सेवेला सोमवारी प्रारंभ करण्यात आला.
महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना काही घोषणा व्यक्त केल्या होत्या. त्याचीच वचनपूर्ती म्हणून महापालिकेतील शिवाजीनगर आणि हैदराबाद रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग अर्थात ओपीडी मोफत करण्याच्या योजनेस सुरुवात करण्यात आली आहे. या प्रसंगी शहरातील कस्तुरबा मातृ सेवा केंद्र शिवाजीनगर व हैदरबाग मनपा रुग्णालयात ही बाह्य रुग्ण सेवा मोफत देण्यात येणार आहे. शहरातील सर्व गरजू व शहरालगतच्या गावातील रुग्णांनी या सुविधेचा उपयोग घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे व उपायुक्त स.अजितपालसिंघ संधू यांनी केले आहे.
यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रिया पंडित, डॉ. विनोद चव्हाण, डॉ. प्रांजली जोशी, डॉ.विजया राठोड, डॉ. सचिन चांडोळकर, डॉ.रितेश बिसेन, डॉ. संध्याराणी देसाई, समूपदेशक माधव सुगांवकर, गिरीष कामिणवर, भास्कर जोंधळे, राजकुमार पांचाळ, माधव आलापुरे, जमुना वाघमारे, शामला पाटील, राघोमोड, राजकुमार तेलंगे,वदीपकराव पाईकराव, मनोज बुंदले, विजय इंगोले यांच्यासह कस्तुरबा मातृ सेवा केंद्र शिवाजीनगर मनपा रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

नांदेडमध्ये १ मेपासून उच्च रक्तदाब आणि मधुमेहग्रस्त रुग्णांकरीता विशेष चिकित्सालय…आधुनिक जीवन शैलीमुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेह या सारखे आजार वाढत आहेत. या आजारांचे वाढते प्रमाण विचारात घेता नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने उच्च रक्तदाब आणि मधुमेह या आजारांच्या निदान आणि तपासणीसाठी विशेषज्ञ आणि समुपदेशक यांच्या सुविधेसह विशेष चिकित्सालयाची उभारणी करण्याचा संकल्प सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात करण्यात आला होता. या विशेष चिकित्सालयाचा प्रारंभ एक मे पासून नांदेड शहरात करण्यात येईल अशी घोषणा महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे. या विशेष चिकित्सालयमधून उपचार घेणाऱ्या रुग्णांना नि:शुल्क  तपासणीसह, औषधींचे वितरण देखील नि:शुल्क करण्यात येणार आहे. यामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेहग्रस्त नागरिकांच्या वैद्यकीय खर्चात बचत होण्यास मदत होईल, असा विश्वास आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!