अपघात

सांगवी येथील २६ वर्षीय तरुणाचा वीज पडून मृत्यू, नायगाव तालुक्यातील सांगवी गावात पसरली शोककळा 

नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित

नांदेड/कुंटूर – नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील मौजे सांगवी या गावातील तरूण चंद्रकांत सुभाष महागावे वय वर्ष २६ या तरुणाचा शुक्रवारी सायंकाळी विज पडून दुर्दैवी मृत्यू झाला.

नायगाव तालुक्यात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला होता. कुंटूर परिसरामध्ये काही ठिकाणी पाऊस व काही ठिकाणी जोरदार वारा सुटला होता. त्या वाऱ्यांमध्ये सांगवी येथील तरुण चंद्रकांत सुभाष महागावे हे शेताकडून घराकडे येत असताना त्यांच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला आहे. मृतदेह नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पोस्टमार्टमसाठी देण्यात आले आहेत. सुभाष पाटील महागाव हे त्यांचे वडील होते. त्यांचाही कोरोनामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला झाला. आधीच वडिलांचे छत्र हरवलेल्या चंद्रकांत महागावे यांच्यावरही निसर्गाने नैसर्गिक परिस्थिती कोपल्यामुळेच विज पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!