राजकीय

नांदेडमध्ये नगरसेवक पदासाठी २ हजार १५३ तर नगराध्यक्ष पदासाठी २१२ उमेदवारी अर्ज..!

जिल्ह्यात १२ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीची निवडणूक, उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी नगराध्यक्ष पदासाठी १३३ तर नगरसेवक पदासाठी १ हजार २५२ उमेदवारांनी दाखल केली उमेदवारी

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील १२ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज १७ नोव्हेंबर रोजी शेवटच्या दिवसापर्यंत नगरसेवक पदासाठी २ हजार १५३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी २१२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. जिल्ह्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती वगळता इतर कोणत्याही प्रमुख पक्षाने युती तसेच आघाडी केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हदगावमध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गट एकत्र आल्याचे सांगण्यात आले आहे. इतर ठिकाणी मात्र सर्वच पक्षांनी आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. नांदेड जिल्ह्यात काँग्रेसने सर्वच ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. भाजपनेही ११ ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रारंभी नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका घेतल्या जात आहेत. नांदेड जिल्ह्यातील १२ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया होत आहे. १७ नोव्हेंबर रोजी शेवटच्या दिवशी नगरसेवक पदासाठी १ हजार २५२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी १३३ उमेदवार शेवटच्या दिवशी रिंगणात उतरले आहेत. जिल्ह्यात १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला होता. १६ नोव्हेंबरपर्यंत नगरसेवक पदासाठी ५१४ अर्ज तर नगराध्यक्ष पदासाठी ३३ अर्ज प्राप्त झाले होते. जिल्ह्यात नगरसेवक पदासाठी सर्वाधिक २६७ अर्ज किनवट नगरपालिकेत प्राप्त झाले आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक ३२ अर्ज हे भोकर नगरपालिकेसाठी प्राप्त झाले आहेत. एकमेव हिमायतनगर पंचायतीसाठी १८९ उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले आहेत तर २१ उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर नगरपालिकेत १८९ अर्ज नगरसेवक पदासाठी तर ११ अर्ज नगराध्यक्ष पदासाठी दाखल झाले आहेत. मुखेड नगरपालिकेत १२२ अर्ज नगरसेवक पदासाठी आणि १२ अर्ज नगराध्यक्ष पदासाठी, बिलोलीत १४५ अर्ज नगरसेवक पदासाठी आणि २१ अर्ज नगराध्यक्ष पदासाठी, कुंडलवाडी नगरपालिकेत १० अर्ज नगराध्यक्ष पदासाठी आणि १५५ अर्ज नगरसेवक पदासाठी, धर्माबादमध्ये १६० अर्ज नगरसेवक पदासाठी आणि १५ अर्ज नगराध्यक्ष पदासाठी उमरीत ७ अर्ज नगराध्यक्ष पदासाठी आणि १०४ अर्ज नगरसेवक पदासाठी, मुदखेड नगरपालिकेत २०६ अर्ज नगरसेवक पदासाठी आणि २१ अर्ज नगराध्यक्ष पदासाठी, भोकरमध्ये ३१ अर्ज नगराध्यक्ष पदासाठी आणि २०८ अर्ज नगरसेवक पदासाठी, हिमायतनगर नगरपंचायतीत २१ अर्ज नगराध्यक्ष पदासाठी आणि १८९ अर्ज नगरसेवक पदासाठी, हदगाव नगरपालिकेत २१ अर्ज नगराध्यक्ष पदासाठी आणि १८२ अर्ज नगरसेवक पदासाठी, किनवट नगरपालिकेसाठी २८ अर्ज नगराध्यक्षपदासाठी आणि २६७ अर्ज नगरसेवक पदासाठी कंधार नगरपालिकेत ८ अर्ज नगराध्यक्ष पदासाठी आणि १२० अर्ज नगरसेवक पदासाठी तर लोहा नगरपालिकेत ५ अर्ज नगराध्यक्ष पदासाठी आणि १०७ अर्ज हे नगरसेवक पदासाठी प्राप्त झाले आहेत.

नगराध्यक्ष पदासाठी हे आहेत काँग्रेसचे उमेदवार..!
देगलूर – मनोरमा निलमवार, मुखेड – डॉ. दिपाली श्रावण रँपनवाड, बिलोली – भारत पवार, धर्माबाद – सविता शंकरराव पाटील, लोहा – सोनू संगेवार, कंधार – शहाजी नळगे, उमरी – श्रद्धा रेणेवाड, मुदखेड- शिलाराज कोतावार, भोकर – संदीप गौड, हिमायतनगर – रफिक शेठ, हदगाव – कुमूद सुनील सोनुले, किनवट – शेख तय्यबा बेगम.                    भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार… लोहा – गजानन सुभाषराव सूर्यवंशी, कंधार – गंगाप्रसाद गोविंदराव यन्नावार, देगलूर- नीलाताई गंगाधर भांगे, कुंडलवाडी – प्रेरणाताई गजानन कोटलवार, मुखेड- विजयाताई राम पत्तेवार, भोकर – भगवान नारायणराव दंडवे, मुदखेड – विश्रांतीताई माधवराव कदम, किनवट – पुष्पाताई आनंदराव मच्छेवार, हिमायतनगर – डॉ. राजेंद्र शेषराव वानखेडे, धर्माबाद – सुनीताताई रमेश गौड जंगमपल्ली, उमरी – स्वप्नाताई श्रीराम माचेवाड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!