राजकीय

भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणीवर नांदेडच्या आणखी सहा महिलांची वर्णी

प्रदेश कार्यकारिणीत सचिवपदी डॉ. शीतल भालके, महादेवी मठपती, शोभाताई बगडे यांची निवड

नांदेड : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणीवर नांदेड येथील सहा महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात विजयाताई घुमनवाड – घिसेवाड, डॉ. शीतलताई भालके,  महादेवी मठपती, शोभाताई बगडे – नळगे, डॉ. मीनाक्षी कागडे आणि धनश्री देव यांचा यात समावेश आहे. नियुक्त करण्यात आलेल्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांना माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते आज गुरुवारी साई सुभाष या संपर्क कार्यालयात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीकडून संघटनात्मक बांधणीवर भर दिला जात आहे. महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीच्या नवीन संघटनात्मक बांधणीमध्ये नांदेडमधील सहा महिला कार्यकर्त्यांना वर्णी मिळाली आहे. या सर्व महिलांच्या नियुक्त्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या आदेशानुसार करण्यात आल्या आहेत. यामध्ये महिला मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी डॉ. शितलताई भालके,  महादेवी गणेश मठपती,  शोभाताई बगडे यांची निवड करण्यात आली तर प्रदेश उपाध्यक्षपदी  धनश्री दत्तात्रय देव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी डॉ. मीनाक्षी शिवाजीराव कागडे,  विजयाताई घुमनवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवनियुक्त सर्व महिला पदाधिकाऱ्यांना माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या साई सुभाष या संपर्क का आज नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह हिंगोली लोकसभा प्रमुख रामदास पाटील सुमठाणकर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ.प्रणिताताई देवरे-चिखलीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, भाजपा जिल्हाध्यक्ष उत्तर ॲड.किशोर देशमुख, महानगर जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, महानगर माजी जिल्हाध्यक्ष प्रविण साले, प्रदेश कार्यकरणी सदस्य चैतन्यबापू देशमुख, प्रदेश कार्यकारणी प्रदेश कार्यकारणी सदस्य, मिलींद देशमुख, दिपकसिंह रावत,  महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा संध्याताई राठोड, प्रदेश कार्यकारणी सदस्य, बाळू खोमणे,  प्रा.जनार्धन ठाकूर,  बालाजीराव शिंदे कासारखेडकर, महानगर जिल्हाध्यक्षा महिला मोर्चा श्रध्दाताई चव्हाण, प्रदेश सह-संयोजक वैद्यकीय आघाडी डॉ. सचिन उमरेकर, शततारका पांढरे, राज यादव, प्रतापराव पावडे, प्रल्हाद उमाटे आदींची उपस्थिती होती.

चिखलीकर गटालाही मिळाले प्रतिनिधीत्व...भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी नांदेडमधील आठ महिलांची प्रदेश कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली. खा. अशोकराव चव्हाण यांच्या शिफारशीनुसार या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. भाजपा प्रवेशानंतर केवळ सहा महिन्यातच थेट प्रदेश कार्यकारीणीवर निवड झाल्यामुळे भाजपातील जुन्या महिला पदाधिकारी संतप्त झाल्या होत्या. आम्ही किती वर्ष केवळ पक्ष कार्यच करायचे, पदे देताना आमचा विचार होणार की नाही, असा सवालही थेट समाजमाध्यमांवर उपस्थित केला होता. त्यामुळे या असंतोषाची दखल माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घेतली असेच या नियुक्त्यावरून दिसून येत आहे. पक्षातील जुन्या, निष्ठावंत महिलांना संधी दिली आहे. त्यामुळे महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीत आता चिखलीकर गटालाही स्थान मिळाल्याचे स्पष्ट झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!