राजकीय

किनवट विधानसभा मतदारसंघात रासपच्या उमेदवाराचा आत्महत्येचा प्रयत्न

एका बैठकीतच प्राशन केले विषारी द्रव्य, ऐन निवडणुकीत घडलेल्या घटनेमुळे उडाली एकच खळबळ

नांदेड : किनवट विधानसभा मतदार संघातील उमेराष्ट्रीय समाज पक्षाचे  उमेदवार गोविंद जेठेवाड यांनी मंगळवारी दुपारी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर गोकुंद्यातील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी आदिलाबादला हलविण्यात आले.

किनवट विधानसभा मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्षाकडून गोविंद जेठेवाड यांना उमेदवारी मिळालेली आहे. गोविंद जेठेवाड यांनी ५ नोव्हेंबर रोजी एका बैठकीदरम्यान विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. ऐन निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीतच हा प्रकार घडला आहे.

या घटनेनंतर जेठेवाड यांना गोकुंद्यातील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी तेलंगणामध्ये आदिलाबाद येथे पाठवले आहे. किनवट ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास केला जात असून या घटनेमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात ही घटना घडल्याने किनवटमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!