दळणवळण

बू@@म … आता नांदेडहून थेट गोव्याला विमान सेवा..!

येत्या जुलैमध्ये ' फ्लाय 91' ची नांदेड - बंगळूरूसह नांदेड - गोवा विमान सेवाही सुरू होणार

नांदेड – नांदेड – मुंबई या मार्गावरील विमानसेवेच्या प्रतिक्षेत असलेल्या नांदेडकरांना आता काही अंशी समाधान देणारी बातमी पुढे आली आहे. नांदेडहून आता थेट गोव्यासाठी ‘फ्लाय 91’ ची विमानसेवा सुरू आहे. याच कंपनीकडून नांदेड – बंगळूरु सेवाही सुरू केली जाणार आहे. येत्या जुलै महिन्यात ही विमानसेवा सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त करताना माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी सेवेचे स्वागत केले आहे.

नांदेड – गोवासह नांदेड – बंगळूरू या मार्गावरील विमानसेवेच्या चाचपणीसाठी फ्लाय 91 या कंपनीच्या अधिकारी प्रतिनिधी नांदेड येथे नुकतीच भेट देऊन विमानतळाची पाहणी केली. या पाहणीनंतर या कंपनीकडून  नांदेड – गोवासह नांदेड – बंगळूरू या मार्गावरील विमानसेवेची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यातील पर्यटकांना गोवा आता थेट एका टेकऑफमध्ये गाठता येणार आहे. नांदेडहून सध्या सुरू असलेल्या विमानसेवेमध्ये सर्वाधिक प्रवासी हे नांदेड – अहमदाबाद या मार्गावरून मिळत आहेत.

दुसरीकडे नांदेडला पाच खासदार कार्यरत असले तरी नांदेड – मुंबई या मार्गावर विमानसेवा सुरू करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश येऊ शकले नाही. मुंबईमध्ये स्लॉट मिळण्याच्या कारणावरून ही सेवा सुरू करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नांदेडकरांना सध्या हैदराबादमार्गेच हवाई सेवेने मुंबई गाठावी लागत आहे. याचा मोठा फटका प्रवाशांसह राजकीय मंडळींनाही बसत आहे.  त्यामुळे नांदेडकरांना आणखी नांदेड – मुंबई या मार्गावरील विमानसेवेची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!