सांस्कृतिक

लावणी, लोकनाट्य कलेला वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

माळेगावात लावणी महोत्सव रंगला, राजकारण्यांसह शैक्षणिक क्षेत्रातील अधिकाऱ्यांचीही लक्षणीय उपस्थिती

नांदेड – माळेगावची यात्रा ही इतर यात्रेपेक्षा आगळीवेगळी आहे. या यात्रेत पारंपरिक लोकनाट्य तमाशा , लावणी कार्यक्रम होत असतात .ही कला जोपासण्याची गरज असून यात्रेच्या विकासासाठी जिल्ह्यातील सर्व पक्षीय खासदार -आमदार व अधिकारी यांची बैठक लवकरच घेण्यात येणार असून यात्रेची भरभराटी व्हावी याससाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. लावणी व लोकनाट्य कलेला नवसंजीवनी देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.

माळेगाव येथे आज २ जानेवारी रोजी लावणी महोत्सवाचे उद्घाटन आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, माजी आमदार गंगाधरराव पटणे, आमदार हेमंत पाटील, आ. बाबूराव कदम कोहळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार चिखलीकर म्हणाले, महाराष्ट्रातील लोकनाट्य व लावणी ही आपली सांस्कृतिक परंपरा आहे. कधी काळी ४८ लोकनाट्य मंडळे होती. मात्र आता ती केवळ मोजक्या प्रमाणात उरली आहेत. या परंपरेला टिकवण्यासाठी सर्वपक्षीय सहकार्य आणि शासनाचे पाठबळ आवश्यक आहे. राज्य शासन जसे नाटकांसाठी अनुदान देते, तसेच लोकनाट्य मंडळांनाही अनुदान मिळावे यासाठी मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लावणी महोत्सवाच्या माध्यमातून या कलेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. महोत्सव हा केवळ मनोरंजनाचे साधन नसून ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही आमदार चिखलीकर म्हणाले.जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची तसेच सर्व लोकप्रतिनिधी मिळून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी बोलणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.यात्रेची श्रीमंती व परंपरेला राजाश्रय मिळवण्यासाठी वचनबद्ध असल्याचा त्यांनी तीनही कार्यक्रमात पुनरुच्चार केला.

सायंकाळी महाराष्ट्रातील नामवंत नऊ संचांकडून सादर झालेल्या लावणी नृत्याने माळेगावात यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरूंना वेड लावले. महोत्सवात संचामध्ये आशा रूपा परभणीकर मोडनिंब, शामल स्नेहा लखनगावकर मोडनिंब, आकांक्षा कुंभार प्रस्तुत मराठमोळा-नादखुळा, प्रिया पाटील सोलापुर प्रस्तुत झंकार घुंगराचा, योगेश देशमुख पुणे प्रस्तुत तुमच्यासाठी कायपण, श्रुती मुंबईकर प्रस्तुत लावण्यवतीचा जलवा या संचाने सादरीकरण केले. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातील अनुराधा नांदेडकर व स्वर सरगम कलासंच माळाकोळी या दोन कला संचांनीही आपली दमदार उपस्थिती नोंदविली.

दरम्यान, ३ जानेवारीला सकाळी ११ वाजता आरोग्य शिबिर होणार आहे. तर याच दिवशी जिल्हा परिषदेमार्फत पारंपारिक लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दुपारी दोन वाजता सुरू होईल.४ जानेवारी रोजी सकाळी दुपारी १२ वाजता शंकर पटाचे     ( बैल जोडी, बैलगाडा शर्यत ) आयोजित करण्यात आली आहे.

लावणी महोत्सवास  उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, प्रवीण पाटील चिखलीकर, बीडीओ दशरथ आडेराघो, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, आनंदराव गुंडले, बबन बारसे, श्रावण पाटील भिलवंडे, दशरथ लोहबंदे, चंद्रमुनी मस्के, बालाजीराव राठोड, माजी गट विकास अधिकारी सुधाकर शिंदे, माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे, शिवाजी कपाळे, शिक्षणाधिकारी माधव सलगर, गटशिक्षणाधिकारी व्यवहारे, सरपंच प्रतिनिधी हणमंत धुळगंडे आदी उपस्थित होते. विविध मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. लावणी महोत्सवाने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!