नांदेड – भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे झालेल्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्यासह माजी शिक्षण आणि बांधकाम सभापती संजय पाटील कऱ्हाळे तसेच आरोग्य आणि शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी हजेरी लावली. या सोहळ्याचे त्यांना भारतीय संरक्षण दलाच्यावतीने विशेष निमंत्रण देण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास एकत्रच उपस्थिती दर्शवून नांदेडचे नाव उंचावले आहे.
भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळ्यास उपस्थित राहण्याबाबत भारतीय संरक्षण दलाच्यावतीने नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण आणि बांधकाम सभापती संजय पाटील कऱ्हाळे तसेच जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य आणि शिक्षण सभापती संजय बेळगे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. या निमंत्रणाचा स्वीकार करीत हे जिल्हा परिषदेचे हे तीनही पदाधिकारी आज भारतीय प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथील कर्तव्य पथावरील मुख्य सोहळ्यात उपस्थित झाले. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झाले. यावेळी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य ध्वजारोहण झाल्यानंतर कर्तव्यपथावरून भारतीय सेना दलाच्या वृत्तीने तसेच विविध राज्यांच्या वतीने चित्ररथ काढण्यात आले. या चित्ररथाच्या माध्यमातून भारतीय परंपरा, संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले तर सेनादलाच्यावतीने भारतीय सैन्याची आधुनिकता आणि सज्जता दर्शविण्यात आली. नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांनी या पदाधिकाऱ्यांची नावे सूचित केली होती. त्यांना प्राप्त निमंत्रणानंतर हे माजी पदाधिकारी या मुख्य सोहळ्यास उपस्थित होते. दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर कार्यक्रमास उपस्थित असताना माजी केंद्रीय मंत्री महेश शर्मा, खासदार मनोज तिवारी, खासदार बासुरी स्वराज, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांची या जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन चर्चा केली.
या सोहळ्यात सहभागी झाल्याचा आपल्याला अभिमान असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी ‘ नांदेड स्क्रिप्ट’ शी बोलताना दिली. त्याचवेळी माजी सभापती संजय पाटील कऱ्हाळे यांनीही हा अतिशय गौरवाचा आणि मानाचा क्षण असल्याचे सांगितले;तर संजय बेळगे यांनीही हा आपला विशेष सन्मान असल्याचे स्पष्ट केले. प्रजासत्ताक दिनाच्या माध्यमातून भारतीय संविधानाची मूल्य प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने हे कार्य करणे गरजेचे आहे. देशात आज प्रत्येक भारतीयाच्या मनात भारतीय संविधानाचे मूल्य रुजविण्याची खरी गरज असल्याचेही या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.