
नांदेड – दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रेस १८ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. यंदा माळेगाव यात्रेत बक्षिसांच्या रकमेत भरघोस वाढ करण्यात आली आहे. यात्रेत येणाऱ्या भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याची माहिती आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. माळेगाव यात्रेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
माळेगाव येथे झालेल्या या बैठकीत विविध विभागांकडून होत असलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपअधीक्षक डॉ . अश्विनी जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ सभापती प्रवीण पाटील चिखलीकर, लोहा पंचायत समितीचे माजी सभापती रोहित पाटील आंडगेकर, लोहा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले, माळेगावची सरपंच हनुमंत धुळगंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत प्रारंभी वाहतूक व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य व्यवस्था आदींचा आढावा घेण्यात आला. यावेळी यात्रेदरम्यान विविध योजनांचा प्रचार प्रसारही केला जाणार आहे. योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना यावेळी आ. चिखलीकर यांनी केली.
पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरी यांनी प्रास्ताविकात यात्रेच्या वैभवशाली परंपरेची माहिती दिली. तयारीची माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी यात्रेच्या तयारीबाबत सांगितले, यात्रेच्या तयारीसाठी जिल्हा परिषदेने सेसमधून तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही निधीची वाढ केली आहे. त्यामध्ये बक्षिसांच्या रकमेत वाढ झाली आहे. पाणीपुरवठा, स्वच्छतागृह यासाठी प्रयत्न करण्यात आले. यात्रा यशस्वी होण्यासाठी सर्वांचे प्रयत्न गरजेचे आहेत. प्रशासकीय पातळीवर हे प्रयत्न केले जात आहेत. स्थानिकांनी यात्रेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करावेत आपले काळजी घ्यावी असे आवाहन कावली यांनी केले.
आ. चिखलीकर यांनी माळेगाव येथे देशभरातून भाविक येत असतात. त्यांच्या सुविधांसाठी प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. शासनस्तरावरून या यात्रेचे वैभव वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून यात्रेसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आपण १९९२ पासून यात्रेचे नेतृत्व करीत आहोत. श्री खंडोबाच्या यात्रेचे वैभव वाढविण्यासाठी यंदा बक्षीसांच्या रकमेत तब्बल ५० लाखांची वाढ करण्यात आली आहे. पशुसंवर्धन, कुस्ती, शंकरपट यासह विविध स्पर्धेतील विजेत्यांना तसेच सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांचा मान सन्मान केला जाईल, असेही आ. चिखलीकर यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर येथील वीज बिलाचा प्रश्न मार्गी लागला आहे. पाणीटंचाईच्या काळात भरलेल्या टँकरचे हे थकित बिल होते मात्र ते जिल्हा परिषदेच्या माथी मारण्यात आले; मात्र आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून या प्रश्न मार्गी लावला असल्याचे चिखलीकर यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विषयात प्राधान्याने लक्ष देताना योजना तात्काळ सुरू करण्यास मान्यता दिली असल्याचेही आ. चिखलीकर यांनी स्पष्ट केले. शासकीय महापूजा संदर्भात मागणी होत आहे. मुख्यमंत्री अथवा त्यांच्या एखाद्या प्रतिनिधी यांच्या हस्ते पूजा व्हावी असे चिखलीकर म्हणाले.
या बैठकीनंतर आमदार चिखलीकर यांनी माळेगाव परिसरात होत असलेल्या माळेगाव यात्रा कामांची विशेष पाहणी केली. श्री खंडेरायाची आरतीही चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी जेसी



