प्रशासकीय

नांदेड लोकसभा मतदार संघासाठी २८ मार्चपासून उमेदवार उतरणार रिंगणात 

४ एप्रिलपर्यत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत

नांदेड :- नांदेड लोकसभा मतदार संघामध्ये  २८ मार्चपासून नाम निर्देशनपत्र दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. २८ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. अर्जांची छाननी ५ एप्रिलला होईल. अर्ज ८ एप्रिलपर्यंत मागे घेता येतील.

नांदेड लोकसभा संघासाठी  २८ मार्चपासून निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी नांदेड यांच्याकडे  ४ एप्रिलपर्यत (सार्वजनिक सुट्टी व्यक्तीरिक्त) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करता येईल, असे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे. नामनिर्देशनपत्राची छाननी  ५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृह येथे करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबतची सूचना उमेदवारांना  ८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यत देता येईल.

 नांदेड जिल्ह्यामध्ये २२ मार्चपर्यंतच्या नोंदीनुसार एकूण मतदारांची संख्या २६ लाख ९७ हजार २८७ आहे. एकूण ३ हजार ८१ मतदान केंद्र  सज्ज ठेवण्यात आहेत. त्यापैकी भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगलूर, मुखेड, या सहा विधानसभा क्षेत्रातील १८ लाख ४३ हजार मतदार नांदेड लोकसभा मतदारसंघात २ हजार ६२ मतदान केंद्रावरून मतदान करणार आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी ९ लाख ५० हजार ९७६ पुरुष, तर ८ लक्ष ९२ हजार १२९ महिला व १३९ तृतीयपंथी आपला मताधिकार बजावणार आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये २५ हजार १४ मतदार हे ८५ वर्ष वयापेक्षा अधिक वयाचे असून त्यांच्यापैकी ज्यांची मतदान केंद्रावर यायची क्षमता नसेल त्यांना बॅलेट पेपरने मतदान करता येणार आहे. प्रशासन त्यांच्या घरी जाऊन मतदान प्रक्रिया पूर्ण करणार आहे. तर जिल्ह्यातील किनवट व हदगाव विधानसभा क्षेत्रातील ५ लाख ५७ हजार मतदार ६४९ केंद्रावरून हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी मतदान करणार आहेत. याशिवाय लोहा विधानसभा क्षेत्रातील २ लाख ९२ हजार  मतदार ३३० मतदार केंद्रावरून लातूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!