प्रशासकीय

नांदेडमध्ये जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्वीकारला पदभार 

अभिजीत राऊत येथे वस्तू व सेवा कर विभागाचे सहायुक्त म्हणून रुजू होणार

नांदेड – केवळ महिनाभरातच तिसरी बदली अनुभवणाऱ्या नवी मुंबई, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक पदावरून नांदेड जिल्हाधिकारी पदी नियुक्ती दिलेल्या राहुल कर्डिले यांनी ६ फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्हाधिकारी म्हणून आपला पदभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडून कर्डिक यांनी आपला पदभार स्वीकारला आहे.

राज्य शासनाने मंगळवारी नांदेडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून राहुल कर्डिले यांची नियुक्ती केली होती. कर्डिले हे ६ फेब्रुवारी रोजी मुंबईहून नांदेडमध्ये दाखल झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत प्रथम सत्रात त्यांनी आपला पदभार स्वीकारला. यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, सहायक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कर्डिले यांनी नांदेडचा पदभार स्वीकारल्यानंतर नांदेडचे मावळते जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे आता छत्रपती संभाजीनगर येथे वस्तू व सेवा कर विभागाचे सहायुक्त म्हणून आपला पदभार स्वीकारणार आहेत.

कर्डिले यांची महिनाभरात तिसरी बदली…कर्डिले यांची महिनाभरात ही तिसरी बदली ठरली आहे. नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी राज्य शासनाने त्यांचे बदली केली होती; मात्र नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी कर्डिले यांच्या नियुक्तीला विरोध दर्शविल्याने त्यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर त्यांना नवी मुंबई येथे सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती देण्यात आली होती. कर्डिले यांनी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकाचा पदभार स्वीकारला; मात्र तेथूनही काही दिवसातच त्यांना बदलीचे आदेश देण्यात आले. हा बदलीचा तिसरा आदेश त्यांना नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती देणारा होता. आज गुरुवारी त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. शिस्तीचे आणि सरळ मार्गी कारभार असलेले कर्डिले हे नांदेडमध्ये आपला कार्यकाळ पूर्ण करतील का याकडेही आता लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!