
नांदेड – जिल्हा परिषदेच्या महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती मंडळाची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी रणजीत गजभारे तर सचिवपदी धनंजय गुम्मलवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
नांदेड जिल्हा परिषद येथे कार्यकारणी निवडण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी रणजीत गजभारे, सचिव पदी धनंजय गुम्मलवार, कार्याध्यक्षपदी राजेश जोंधळे, कोषाध्यक्षपदी सचिन चौदंते व प्रसिद्धी प्रमुख म्हणून जितेंद्र तोटलवार यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बाळासाहेब लोणे, पवन तलवारे, राघवेंद्र मदनुरकर, आनंद सावंत, सतीश जकाते,श्रीमती छाया कांबळे, संतोष मठपती, दीपक महालिंगे, प्रदीप परोडवाड, कांबळे, गजानन आगरमोरे, विक्रम रेनगुंटवार, कमल दर्डा, योगेश वाघ, नरंगलकर आदींची उपस्थिती होती.