दळणवळण

जुना मोंढा, नवीन पूल रस्ता १५ जूनपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार 

रस्ता कामासाठी वाहतूक आता रवीनगर कौठा मार्गे वळविण्यात येणार

नांदेड – नांदेड शहरातील जुना मोंढा – गोदावरी नदीवरील पूल ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत राज्य महामार्ग क्रमांक २५६ आणि नांदेड – लातूर रस्ता त्यानंतर भगतसिंह चौक ते गोदावरी नदीवरील नवीन पूल अर्थात पश्चिम वळण रस्ता या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण, नाली बांधकाम, रस्ता दुभाजकासह संगम स्थळांची सुधारणा करणे यासाठी जुना मोंढा ते गोदावरी पूल या भागातील वाहतूक इतर मार्गाने वळवण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. १५ जूनपर्यंत पर्यायी मार्गाने सर्व प्रकारची वाहतूक वळविण्यात येणार आहे.

जुना मोंढा ते शर्मा ट्रॅव्हल्स कार्यालय कौठा हा रस्ता वाहनांसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे. यासाठी पर्यायी मार्ग जुना मोंढा, वजीराबाद, कौठा, रवीनगर, शर्मा ट्रॅव्हल्स कार्यालय कौठा याप्रमाणे राहणार आहे. नांदेड पोलीस अधीक्षकांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आवश्यक ती उपाययोजना करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी रस्ता वाहतूक प्रतिबंध व पर्यायी रस्त्यासाठी आवश्यक असलेले बोर्ड, चिन्ह लावावे, याबाबतची कारवाई करावी अशी अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!