प्रशासकीय

नांदेडच्या महिला सीईओंना मध्यरात्री केले असभ्य, अश्लील, धमकी वजा मेसेज 

नांदेड जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याचा प्रताप, आनंद सावंतवर निलंबनाची कारवाई 

नांदेड – तक्रारीच्या अनुषंगाने विभाग बदल केल्यानंतर नांदेड जिल्हा परिषदेच्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वैयक्तिक व्हाट्स ॲपवर मध्यरात्री असभ्य, राजकीय, अश्लील आणि धमकी वजा संदेश पाठवणाऱ्या नांदेड जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या कनिष्ठ प्रशासन अधिकारी आनंद व्यंकटराव सावंत यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सीईओंच्या व्हाट्स ॲपसह विभाग प्रमुखांच्या व्हाट्स ॲप ग्रुपवरही सावंत यांनी असभ्य, अश्लील मेसेज टाकल्याची बाब पुढे आली आहे.

नांदेड जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी आनंद व्यंकटराव सावंत यांच्याविरुद्ध पदस्थापने बाबत तक्रारीच्या अनुषंगाने बदल विभाग बदल करण्यात आलेला आहे. याच कारणावरून सावंत यांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास विभाग प्रमुखांच्या व्हाट्स ॲप ग्रुपवर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वैयक्तिक व्हाट्स ॲप क्रमांकावर असभ्य, राजकीय, अश्लील आणि धमकी वजा संदेश पाठविले आहेत. यावरून सावंत यांच्याविरुद्ध वर्तणूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

निलंबन काळात सावंत यांचे मुख्यालय हे पंचायत विभाग राहील. निलंबन काळात सावंत यांना खाजगी नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नाही, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी निलंबनाचे हे आदेश पारित केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!