
नांदेड – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी १४ ऑक्टोबर रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. महापालिकेच्या एकूण २० प्रभागांमध्ये ८१ नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. त्यामध्ये चार सदस्य असलेल्या प्रभागांची संख्या १९ राहणार आहे तर पाच सदस्यीय एक प्रभाग राहणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी ही माहिती दिली. महापालिकेची अंतिम प्रभागरचना महापालिकेच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक एक तरोडा खुर्दमध्ये २७ हजार ४४७ एकूण लोकसंख्या आहे. या प्रभागाच्या व्याप्तीमध्ये तरोडा खुर्द मुळ गाव, राजेशनगर, शिवरायनगर, मंत्रीनगर, जि.प.कॉलनी, स्वागतनगर, अयोध्या नगर, शाकुंतल शाळा, साई ऑटो गॅस वेल्डिंग, राज पिठाची गिरणी आदींचा समावेश राहणार आहे.
प्रभाग क्रमांक दोन तरोडा बु.मध्ये २८ हजार ६४७ मतदार राहतील. या प्रभागाच्या व्याप्तीमध्ये तरोडा मूळ गाव, आसरा नगर, नालंदानगर, गणी कॉलनी, पालदेवारनगर, बी अँड सी कॉलनी यासह आसना नदीपर्यंतचा भाग त्याचवेळी केंद्रीय विद्यालय ते कब्रस्तान, विमानतळ रस्ता जय महाराष्ट्र धाबा आदी भागापर्यंत हा प्रभाग समाविष्ट आहे. प्रभाग क्रमांक तीन सांगवीमध्ये २५ हजार ६६ मतदार आहेत. या प्रभागाची व्याप्ती सांगवी मुळगाव, पांडुरंग नगर, बजरंग नगर, ज्ञानमाता स्कूल, म्हाळजा, गोशाळा दक्षिणेकडे मनपा हद्दीतील रेल्वे ट्रॅकपर्यंत त्याचवेळी मालटेकडी अंडर ब्रीज, रेल्वे डिव्हिजन कंपाउंड वॉलपर्यंतही हा प्रभाग राहणार आहे.
प्रभाग चार हनुमान गडअंतर्गत सुंदरनगर, शोभानगर हनुमान गड, एमजीएम कॉलेज, शारदा नगर, नंदिग्राम सोसायटी, पौर्णिमा नगरसह, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, वसंतराव नाईक चौक, आनंदनगर, भाग्यनगर तसेच विमानतळ भिंतीलगतचा भाग समाविष्ट आहे. या प्रभागाची लोकसंख्या २४ हजार ६९७ इतकी आहे.
प्रभाग पाच भाग्यनगरमध्ये एकूण लोकसंख्या २९ हजार १२१ इतकी आहे. या प्रभागांतर्गत भाग्यनगर, सहयोगनगर, पीर बुऱ्हानगर, कैलासनगर, बाबानगर, राजेंद्रनगर, डीएड कॉलेज परिसर, पोलीस कॉलनी इंदिरानगर, आंबेकर नगर, शाहूनगरचा भाग त्यासोबतच इंदिरानगर, शोभानगर, विद्युतनगर, स्नेहनगर पोलीस वसाहत, आदीसह वर्कशॉप कॉर्नर से राज कॉर्नरपर्यंतचा भाग समाविष्ट आहे.
प्रभाग सहा गणेशनगरमध्ये २९ हजार ५६ इतकी लोकसंख्या आहे. या प्रभागाअंतर्गत गणेशनगर, यशवंतनगर, समतानगर, रामानंदनगर, लेबर कॉलनी, यशवंतनगर, काबरानगर, बजाजनगर, दिपनगर, विद्यानगर निजाम कॉलनी, मयूर विहार कॉलनी, परिमलनगर नंदनवन कॉलनी, जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान पुष्पनगर, काबरानगर आदी भाग समाविष्ट आहे.
प्रभाग क्रमांक सात भीमनगर, मगदूमनगर या प्रभागात २४ हजार ४७३ इतकी लोकसंख्या आहे. या प्रभागांतर्गत लेबर कॉलनी, राजनगर, नागसेनगर, विजयनगर, जयभीम नगर, सावित्रीबाई फुले नगर, अभिजीत नगर, उद्योग नगर, आशीर्वाद नगर, मगदूमनगर, गणेशनगर वाय पॉईंट, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नई आबादी, आंबेडकर नगर, पिवळी गिरणी, जनता कॉलनी, नसरतपूर आदी भागांचा समावेश आहे
प्रभाग क्रमांक आठ शिवाजीनगरमध्ये शिवाजीनगरसह नई आबादी, आंबेडकर नगर, विसावा नगर, शिवाजीनगर डॉक्टर लाईन, गोकुळ नगर, गोरक्षण, स्टेडियम, विसावा गार्डन, लालवाडी, श्रावस्तीनगर, पारसनगर, महावीर सोसायटी, महात्मा फुले शाळा, आयटीएम कॉलेज, नसरतपूर, अरविंद नगर, रेल्वे लाईन आदी नगरांचा समावेश आहे. या प्रभागाची लोकसंख्या २४ हजार ७५९ इतकी आहे.
प्रभाग क्रमांक ९ नवा मोंढामध्ये नवा मोंढासह, हमालपुरा, मगनपुरा, ईश्वरनगर, विष्णुनगर, बाबानगर, तंत्रनिकेतन कॉलेज, शाहूनगर, वसंतनगर, खोब्रागडे नगर, आनंदनगर चौक ते वसंतराव नाईक चौक, अण्णाभाऊ साठे चौक ते हिंगोली गेट ब्रिज, हिंगोली गेट ते रेल्वे लाईन त्यासोबतच शासकीय तंत्रनिकेतन कोपरा आदीचा समावेश असून या प्रभागाची लोकसंख्या २४ हजार ६६३ इतकी आहे.
प्रभाग क्रमांक दहा दत्तनगरची लोकसंख्या २६ हजार ६०७ इतकी आहे. या प्रभागाची व्याप्ती दत्तनगर, दरवेशनगर, फारूक नगर, बालाजी नगर, तानाजी नगर, टाऊन मार्केट, नागार्जुन नगर, पटेल कॉलनी, शिवनगर, मेहबूबनगर यासोबतच हिंगोली गेट आरयुबी ते उत्तरेकडे जुना हिंगोली आदींचा समावेश आहे.
प्रभाग क्रमांक ११ मध्ये २९ हजार ४९६ इतकी लोकसंख्या आहे. हैदरबाग प्रभागामध्ये हैदरबाग, कापूस संशोधन केंद्र, केळी संशोधन केंद्र, गोदावरी कॉलनी, इस्लामपुरा, गुलशन कॉलनी, रहमान कॉलनी, गुलजारबाग, हैदराबाद कॉलनी, चुनाभट्टी रोड, वाल्मीक नगर, गाडेगाव रस्त्याच्या पश्चिमेकडे व उबेद कॉलनी हैदरबाग दवाखाना, बोंढार बायपास, गाडेगाव रोड, केळी संशोधन परिक्षेत्राची सुरक्षा भिंत, देगलूर नाका या भागाचा समावेश आहे.
प्रभाग क्रमांक १२ उमर कॉलनीमध्ये २९ हजार ३१० लोकसंख्या आहे. या प्रभागांतर्गत तुराबनगर, उमर कॉलनी, बागवान कॉलनी, खुसरोनगर, हबीबिया कॉलनी, ईदगाह परिसर, मोसंबीचा मळा बोंढार, महबूबिया कॉलनी, जुना पुल, देगलूर नाका चौक, गाडेगाव रस्त्याने बोंढार बायपासपर्यंत या प्रभागाची व्याप्ती आहे.
प्रभाग १३ अंतर्गत चौफाळा, करबला, बिलाल नगर, रजा कॉलनी, महंतवाडी, ब्रह्मपुरी, सिद्धनाथ पुरी, मोमीनपुरा, सिद्धार्थ नगर, हतई, गनीमपुरा, करबला, चौफाळा, मन्सूर खा हवेली, पंचशील नगर, गंगानगर, राम रहीमनगर, बिलाल नगर, नावघाट पुलापर्यंत तसेच उत्तरेकडे रंगार गल्ली येथील सागर किराणापर्यंत हा प्रभाग राहणार आहे
प्रभाग १४ इतवारा मदिनानगरअंतर्गत इतवारामधील देशमुख नगर, अली नगर, साईनगर, खोजा कॉलनी, शक्ती नगर, रजानगर, कच्ची कॉलनी, केळी मार्केटचा भाग, आंबेडकर वाचनालय, इतवारा मार्केट, मर्कज मशिद, बिलाल नगर रोड, मन्यार गल्ली, हबीब टॉकीज, केळी मार्केटपर्यंत हा प्रभाग विस्तारित झाला आहे.
प्रभाग क्रमांक १५ होळी मन्यार गल्लीमध्ये होळी, मन्यार गल्ली, हनुमान मंदिर, मुल्ला बुरहान टेकडा, लाल वारा रोड, बर्की चौक, जंगम गल्ली, नगरेश्वर मंदिर परिसर, गौतम नगर, नावघाट परिसर, मारवाड गल्ली, जोशी गल्ली, किल्ला परिसर, गवळी गल्ली, आईना महल, मंडई, विणकर कॉलनी, खुर्शिद जहागीरदार चौक, कालापूल हबीब टॉकीज भागाचा या प्रभागात समावेश आहे.
प्रभाग १६ गाडीपुरा वजीराबाद या प्रभागात गाडीपुरा वजीराबादचा भाग, बडी दर्गा, जुना मोंढा, हनुमान टेकडी, नगीना घाट, छावणी, पुंडलिकवाडी, गुरुद्वारा रोड, तारासिंग मार्केट, बंदाघाट रोड, शनि मंदिर, उदासीमठ, बालाजी मंदिर परिसर, भीमघाट, गोवर्धन घाट टेकडी, छोटी दर्गा, महावीर चौक, जुने क्षेत्रीय कार्यालय क्रमांक पाच, नवीन काला पूल, गोदावरी नदी तसेच गोदावरी नदी ते भीमघाट ते पोलीस परेड ग्राउंड संरक्षण भिंतीपर्यंत हा प्रभाग राहणार आहे
प्रभाग क्रमांक १७ गुरुद्वारा या अंतर्गत एकूण लोकसंख्या २५ हजार २८६ इतकी आहे. या प्रभागाची व्याप्ती गुरुद्वारा, कलामंदिर, सोमेश कॉलनी, आयुर्वेद कॉलेज, महापालिका मुख्य कार्यालय, खादी ग्रामोद्योग, खालसा हायस्कूल, सिंधी कॉलनी, तहसील परिसर, गवळीपुरा, खालसा कॉलनी, लहुजी नगर, इतवारा, भंगार लाईन, तिरंगा चौक, शिवाजीनगर ओव्हर ब्रिजपर्यंत हा प्रभाग राहील.
प्रभाग क्रमांक १८ खडकपुरा देगाव चाळमध्ये बारा इमाम मशिद, सेंट्रल जेल, नांदेड टेक्स्टाईल मिल, दूल्हेशहा रहमान नगर, पक्कीचाळ, गंगाचाळ, भीमघाटचा भाग, पंचशील नगर, नल्लागुट्टा चाळ, भैय्यासाहेब आंबेडकरनगर, रेल्वे पटरी, भीमघाट, गोदावरी नदी आदी भागांचा समावेश आहे.
प्रभाग क्रमांक वसरणी, कौठा अंतर्गत २९ हजार ६८७ इतकी लोकसंख्या आहे. या प्रभागांतर्गत फत्तेजंगपूर, असर्जन, कौठा, वसरणी, रहिमपूर, सिडकोचा भाग, गोदावरी नदी, मनपा हद्दपासून सिडको मुख्य रस्ता ते सनराइज् इंग्लिश स्कूल, भगवान बाबा चौक ते लातूर रोड मनपा हद्द या भागांचा समावेश आहे .
महापालिकेचा एकमेव पाच नगरसेवक असलेला प्रभाग सिडको वाघाळा हा आहे. या प्रभागांतर्गत असदवन दक्षिणेकडे शिवमंदिर आणि मनपा हद्दीपर्यंत हा प्रभाग राहील, असे महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी स्पष्ट केले आहे. महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या प्रभागाच्या सीमा दर्शविणारे नकाशे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी महापालिका कार्यालयात उपलब्ध राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे



