क्राईम

मुखेडमध्ये अल्पवयीन बालिकेवर अत्याचार ; गुन्हा दाखल

आरोपीला केली अटक, कोणाचीही गय करणार नसल्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले स्पष्ट

नांदेड – मुखेड शहरातील नारलावार गल्ली येथे एका अल्पवयीन बालिकेवर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा मानवीय प्रकार शुक्रवारी घडला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ओमकार सतिष डाकूरवार (रा. नारलावार गल्ली, मुखेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुखेड पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेनंतर  परिसरात एकच संतापाची लाट उसळली आहे.

मुखेड येथील एका खाजगी शिकवणीनंतर सहा वर्षीय बालिका घरी परतत असताना ७ नोव्हेंबर रोजी सायं. ६.४५ ते  ७  वाजताच्या सुमारास आरोपीच्या घराजवळ हा अमानुष प्रकार घडला. खाजगी शिकवणी झाल्यानंतर बालिका घरी परतत असताना आरोपीने तिला बांधकाम सुरू असलेल्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी मुखेड ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पो.उप.नि. किरण बेंबडे (पोलीस ठाणे देगलुर) यांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. प्रकरणाची नोंद पो.उप.नि. माने (मुखेड पोलीस ठाणे) यांनी केली असून तपास सुरू केला आहे. घटनेचे वृत कळताच पोलीस उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी यानी घटनास्थळास भेट देवुन पाहणी केली. पिडीत मुलीस पुढील उपचारासाठी नांदेड जिल्हा रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. तर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अशा संवेदनशील प्रकरणात पोलीस कुणाचीही गय करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील आरोपीस अटक केली असून पुढील कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!