सामाजिक

शिवजयंतीनिमित्त नांदेड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने अभिवादन

छत्रपती शिवरायांनी स्वराज्यात समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या तत्त्वांची केली जोपासना - संतोष पांडागळे

नांदेड – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा राजा, बहुजनांचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी सर्व बहुजनांना एकत्र करून लढा उभा केला. छत्रपती शिवरायांनी लोककल्याणकारी राज्य निर्माण व्हावे यासाठी शेतकऱ्यांची आर्थिक मदतही केली. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या तत्त्वांची जोपासना तर केलीच पण एक सक्षम समाज घडवण्यासाठी तसेच समाजविकास आणि परिवर्तनाची दृष्टी कायम समोर ठेवली होती असे प्रतिपादन पत्रकार संघाचे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांनी केले. कार्याध्यक्ष अनिल कसबे यांनी अन्याय, अत्याचाराने हतबल झालेल्या प्रजेला नेहमीच न्याय देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज कायम तत्पर असायचे. अगदी बिकट परिस्थितीत त्यांनी न डगमगता स्वराज्याची निर्मिती केल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस अनुराग पोवळे, लक्ष्मण भवरे, प्रशांत गवळे, प्रल्हाद लोहेकर, सुरेश काशिदे, माधव गोधणे, दीपंकर बावस्कर, मनोहर कदम, गजानन कानडे, शरद काटकर, रघुनाथ पोतरे, आनंदा बोकारे, भास्कर जामकर, शिवाजी शिंदे आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!