महापालिका

नांदेड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती, शिक्षण, महिला व बालकल्याण सभापतीची निवड २४ मार्च रोजी होणार

पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले काम पाहणार, स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी स. विरेंद्रसिंघ गाडीवाले यांचे नाव आघाडीवर 

नांदेड – नांदेड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण सभापतीची निवड २४ मार्च रोजी होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा घेतली जाणार आहे. महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी आला भारतीय जनता पक्षाचे स.विरेंद्रसिंघ गाडीवाले यांचे नाव आघाडीवर आहे.
नांदेड महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा महापौर कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत शहरात दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचवेळी स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती तसेच स्वीकृत सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये स्थायी समिती सदस्यांमध्ये भाजपा शिवसेना महायुतीचे स. वीरेंद्रसिंघ जगतसिंग गाडीवाले, सदाशिव शंकर पुरी, आशिष धोंडीराज नेरलकर, सुमित प्रकाश मुथा, अभिषेक रमेशराव सौदे, तुळजाराम गणेशलाल यादव, दिपाली संतोष मोरे, कविता नागनाथ गड्डम, सरिता गंगामनी बिरकले, नीलम तुलजेश यादव, एमआयएमचे अल्ताफ हुसेन,  शिफा तरन्नुम अब्दुल रऊफ, बेबी शाईस्ता मोहम्मद सलमान खान आणि नांदेड लोकन्याय आघाडीच्या परविन बेगम शेख पाशा, सुनिता रूपकराव जोंधळे आणि राहुल मधुकरराव सोनसळे यांचा समावेश आहे.
याच सभेत शिक्षण महिला व बालकल्याण समिती सदस्यांचीही निवड करण्यात आली. यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या सदिच्छा सोनी पाटील, निरंजना राजू लांडगे, अमृताबाई बजरंगसिंह ठाकुर, संध्या महेंद्र देमगुंडे, सुलोचना धोंडीबा काकडे, मनप्रीतकौर अमरजीतसिंघ कुंजीवाले, नीलम तुलजेश यादव,  एमआयएमच्या अश्विनी दशरथ धोंगडे, अल्कसेरी सुमैया गुलअफशा, नांदेड लोकन्याय विकास आघाडीच्या अफिया नाज काझी नाफे आणि राजश्री जिजाभाऊ गोडबोले राक्षसमारे यांचा समावेश आहे.
महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने अमितसिंह गोपालसिंह तेहरा, दिलीप व्यंकटराव कंदकुर्ते, आशुतोष गणेशलाल जोशी, डॉ. अंकुश विठ्ठलराव देवसरकर, सुप्रिया संजय पाटील, काँग्रेस- वंचित आघाडीकडून शेख बिलाल शेख रसूल, मुन्ना अब्बास हुसेन रज्जब अली आणि एमआयएमकडून मोहम्मद नासेर अहमद मो. इकबाल अहमद यांची निवड करण्यात आली आहे.

नांदेडमध्ये पहिल्याच सभेत विरोधकांकडून भाजपा- शिवसेना महायुतीवर सुलतानी वार..! नांदेड महापालिकेच्या पहिल्याच सभेत भारतीय जनता पक्षाकडून दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा ठराव संमत करण्यात आला आहे. याच ठरावाच्या चर्चेदरम्यान काँग्रेसचे अब्दुल गफार यांनी शहरांमध्ये माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, पहिला महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह दिवंगत माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांचाही पुतळा उभारावा अशी मागणी केली. वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले यांनी थेट शहरात टिपू सुलतान यांचा पुतळा उभारण्याचा ठराव करण्याची मागणी केली. विरोधकांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करीत सत्ताधाऱ्यांनी विविध समित्यांच्या सदस्य निवडी घोषित केल्या. तिकडे एमआयएमकडून विरोधी पक्ष नेत्याचा प्रश्न उपस्थित केला जात होता. या सर्व गोंधळातच महापालिकेची पहिली सभा राष्ट्रगीताने संपन्न झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!