क्राईम

नांदेडमध्ये माय लेकीचा संशयास्पद मृत्यू..!

वजिराबाद भागातील घटना, मृत्यूचे कारण अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू 

नांदेड – नांदेड शहरातील वजिराबाद भागात मायलेकीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे. या प्रकरणात वजीराबाद पोलिसाकडून तपास सुरू आहे. शासकीय रुग्णालयात आणले असता त्यांचा मृत्यू झाला असल्याचे घोषीत करण्यात आले. वजिराबाद पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मागे राहत असलेल्या काजल विजय जाधव वय ३२ या आपली मुलगी विशाखा (वय १२) हिच्यासोबत राहत होत्या. त्या कौठा भागातील यशोसाई रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. आज शुक्रवारी या मायलेकी घराबाहेर पडल्या नसल्याने शेजाऱ्यांनी घराबाहेरून आवाज दिला. मात्र प्रतिसाद त्यांचा कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांनी घराचे दार मोडून उघडले. आत दोघीही झोपलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यांना तातडीने शहरातील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र काजल विजय जाधव वय ३२ आणि मुलगी विशाखा जाधव वय १२ हिचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच वजिराबाद ठाण्याचे पोलीस कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी अधिक माहितीनंतर या माय लेकीचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात पाठविले आहेत.

दरम्यान, काजल जाधव या गेल्या काही वर्षांपासून आपल्या पतीपासून विभक्त राहत होत्या. त्या यशोसाई रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत आपला उदरनिर्वाह चालवित होत्या. अचानक झालेल्या या मायलेकीच्या मृत्यूने नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात एकच हंबरडा फोडला. पोलीस आता या घटनेची अधिक चौकशी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!