महापालिका

नांदेडमध्ये रिलायन्स स्मार्ट बाजारची जाहिरात करणारे १० ऑटो महापालिकेच्या ताब्यात..!

कोणतीही परवानगी न घेताच जाहिरात, महापालिकेने ठोठावला दंड, व्यावसायिक प्रतिष्ठांनांनी परवानगीनंतरच जाहिरातबाजी करावी, अन्यथा कठोर कारवाई, महापालिकेचा इशारा

नांदेड – नांदेडमध्ये महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता ‘स्मार्ट बाजार’ची जाहिरात करणारे १० ऑटो महापालिकेने गुरुवारी सकाळी ताब्यात घेतले. महापालिकेने ही कारवाई करताच स्मार्ट बाजारने तातडीने महापालिकेशी संपर्क साधला. त्यानंतर दंड ठोठावत महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला.
नांदेड शहरात नव्याने सुरू झालेल्या रिलायन्स स्मार्ट बाजारने वेगवेगळ्या योजना ग्राहकांसाठी आणल्या आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर योजनांची जाहिरात करणाऱ्या स्मार्ट बाजारचे तब्बल दहा ऑटो शहरात फिरत होते. ही बाब महापालिकेला कळताच महापालिकेने हे ऑटो ताब्यात घेतले. सर्व ऑटो महापालिकेच्या मुख्यालयात जमा करण्यात आले होते. कोणतीही परवानगी न घेता जाहिरात कशी केली जात आहे..? अशी विचारणा त्यांना करण्यात आली. त्यावेळी रिलायन्स स्मार्ट बाजार व्यवस्थापनाने महापालिकेशी संपर्क साधला. महापालिकेने या ऑटोवर मोठा दंड ठोठावत कारवाई केली आहे.

या कारवाईनंतर रिलायन्स स्मार्ट बाजारच्या व्यवस्थापनाने महापालिकेची आवश्यक ती सर्व परवानगी घेतली. याबाबत महापालिका उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनी सांगितले, कोणत्याही व्यावसायिक व्यवस्थापनाने विनापरवानगी जाहिरात करणे टाळावे, महापालिकेशी संपर्क साधून आवश्यक ती परवानगीची प्रक्रिया पूर्ण करावी. त्याचवेळी आवश्यक ते शुल्क भरावे त्यानंतरच शहरात जाहिरातबाजी करावी, अन्यथा व्यापारी प्रतिष्ठांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!