महापालिका

नांदेडकरांनो सावधान..! संततधार पावसामुळे नांदेड महापालिकेचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी महापालिका यंत्रणा सज्ज, सहाही क्षेत्रिय कार्यालयांना सज्ज राहण्याचे आयुक्तांचे आदेश, सखल भागातील नगरांवर विशेष लक्ष

नांदेड – नांदेड शहरात गुरुवारी पहाटेपासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सर्व यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ महापालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचा आवाहन महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे. शहरातील सहाही क्षेत्रीय कार्यालयांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नांदेड शहरात गुरुवारी पहाटेपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा जोर कमी अधिक होत आहे. त्याचवेळी गुरुवारी रात्रीही हा पाऊस असाच सुरू राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पावसाचा जोर कायम राहिल्यास शहरातील सखल भागात पाणी साचण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड महापालिकेच्या सर्व सहा क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आपल्या आवश्यकता यंत्रणेसह सज्ज राहण्यासाठी सूचना दिल्या आहेत. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा आणि मल नि:सारण विभागातील अभियंता यांनाही रात्री फिल्डवर राहण्यासाठी आदेशित करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

गुरुवारी सकाळपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शहरातील सखल भागातील पावसाचा सध्यातरी सातत्याने निचरा होत आहे. पाऊस वाढल्यास हा निचरा होण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. यामध्ये महापालिकेने मुख्यालयात दोन जेसीबी, ट्रॅक्टर, स्कूल बस, लेबर राखीव ठेवले आहेत. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी गरज पडल्यास संपर्क साधून ही यंत्रणा तात्काळ आपल्या भागात मागवून घ्यावी अशी सूचनाही करण्यात आली आहे.

ज्या ठिकाणी सखल भाग आहे त्या भागातील पाणी पाण्याचा निचरा सातत्याने होईल याकडेही कटाक्षाने लक्ष देण्याचे कळविण्यात आले आहे. त्याचवेळी महापालिकेने आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता काही ठिकाणी निवारा केंद्राच्या सज्जतेचेही आदेश दिले आहेत. सर्व स्वच्छता निरीक्षकांनी सतर्क राहून पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल, याकडेही लक्ष देण्याबाबत कळवले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा आणि मलनि:सारण विभाग यांनी आपले सर्व अभियंते फिल्डवर राहतील याची शहानिशा करून घ्यावी असेही आदेशित केले आहे. यांत्रिकी विभागाने रेल्वे अंडरब्रीजची पंपिंग सातत्याने सुरू राहील यासाठी संबंधित ठेकेदाराला सूचना देऊन त्याच्या संपर्कात राहण्यास कळवले आहेत. शहरातील हमालपुरा भागात विशेष लक्ष ठेवण्याबाबतही क्षेत्रीय कार्यालयाला कळविण्यात आले आहे.

एकूणच कोणत्याही परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी महापालिका यंत्रणा पोहोचल्या सज्ज झाली आहे सज्ज ठेवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. फरहत उल्हा बेग यांनी नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून न जाता महापालिकेच्या 24 तास सुरू असलेल्या नियंत्रण कक्षातील 02462- 234461 व 02462-230721 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!